बनावट दारू विक्री करणा-या महिलेस पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:15 IST2021-04-17T04:15:47+5:302021-04-17T04:15:47+5:30
जळगाव : सुप्रिम कॉलनीत बनावट दारू विक्री करणा-या सोनम बलविर कंजर या महिलेला गुरूवारी एलसीबीच्या पथकाने अटक केली होती. ...

बनावट दारू विक्री करणा-या महिलेस पोलीस कोठडी
जळगाव : सुप्रिम कॉलनीत बनावट दारू विक्री करणा-या सोनम बलविर कंजर या महिलेला गुरूवारी एलसीबीच्या पथकाने अटक केली होती. तिला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोनम कंजर ही महिला स्पीरिट या रसायनाद्वारे बनविलेली दारू विक्री करीत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकला मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी दुपारी एलसीबीच्या पथकाने सुप्रिम कॉलनीतील बनावट दारूच्या अड्डयावर धाड टाकून महिलेस अटक केली होती व साडे चार हजार रूपयांची दारू जप्त केली होती. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी महिलेस एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. सदर महिलेस शुक्रवारी एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.