शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

जळगाव : साहेब, तो बघा काळ्या बॅगवाला... अन् पकडताच मिळाले २७ मोबाईल

By सागर दुबे | Updated: April 19, 2023 17:03 IST

रामानंदनगर पोलिसांनी 'झारखंड'ची आणची एक थैली गँग पकडली

जळगाव : जळगावसह अकोला, नाशिक, खामगाव, भुसावळ येथील भाजी बाजारांमध्ये फिरून ग्राहकांच्या खिशातून मोबाईल लांबविणार्‍या झारखंडच्या 'थैली गँग'चा दहा दिवसांपूर्वी रामानंदनगर पोलिसांनी पर्दाफाश केला होता. यात पोलिसांनी १५ मोबाईल हस्तगत केले होते. आता पुन्हा रामानंदनगर पोलिसांनी आणखी एका 'थैली गँग'ला बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याजवळून चोरीचे २७ मोबाईल ताब्यात घेतले असून आणखी काही मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. दरम्यान, ही गँग मोबाईल लांबविल्यानंतर झारखंड येथे विक्रीसाठी घेवून जात असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली.

इंद्रनिल सोसायटी येथील नितीन सोनवणे हे १३ एप्रिल रोजी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह परिसरातील भाजी बाजारात खरेदीसाठी आले होते. भाजी खरेदी करताना त्यांच्याजवळील मोबाईल दोन जणांनी हिसकाविण्याचा प्रयत्न केला. झटापट होवून सोनवणे यांनी एका अल्पवयीन मुलाला पकडून थेट रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. रामानंदनगर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याच्या दुस-या साथीदाराचा मोबाईल क्रमांक पोलिसांना मिळाला. हळूहळू त्याची माहिती मिळाल्यानंतर तो भुसावळात असल्याची माहिती मिळाली आणि रात्रीच पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलालासोबत घेवून भुसावळ गाठले.बॅगमध्ये तब्बल २७ मोबाईलरात्री भुसावळातील बसस्थानक परिसरात पोलिस अल्पवयीन चोरट्याच्या साथीदाराचा शोध सुरू असताना, अल्पवयीन मुलाने लागलीच पोलिसांना सांगितले की, 'साहेब तो बघा काळ्या बॅगवाला उभा आहे तोच आहे तो' आणि पोलिसांनी सापळा रचून त्याच्या साथीदाराला पकडले. दरम्यान, त्याच ठिकाणी त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्या बॅगमध्ये तब्बल २७ मोबाईल पोलिसांना मिळून आले. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले तर त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली. तर दोघेही झारखंड येथील असल्याची माहिती तपासात समोर आली. तर ही गँग लहान मुलांच्या मदतीने मोबाईल लांबवित असल्याची माहिती समोर आली.आतापर्यंत ४ जणांना अटक, ६ ताब्यात...दोन आठवड्यापूर्वी दादावाडी येथील लखीचंद वामन बडगुजर हे मोबाईल दुरुस्त करण्यासाठी पिंप्राळ्यातील सोमाणी मार्केटमध्ये जात होते. त्यावेळी चार युवकांनी त्यांच्याजवळील मोबाईल लांबविण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील तीन जणांना लोकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. रामानंदनगर पोलिसांनी चौथ्याचा शोध घेवून त्याला अटक केली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी तब्बल १५ मोबाईल ताब्यात घेतले होते. तर ही सुद्धा थैली गँग असल्याचे समोर आले होते. आतापर्यंत दोन्ही गुन्ह्यांमध्ये एकूण ४ जणांना अटक झाली असून सद्या ते कारागृहात आहेत. तर ६ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर एकूण ४२ मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहे.यांनी केली कारवाईपोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील, सपोनि. रोहिदास गभाले, पोउपनि. गोपाल देशमुख, रेवानंद साळूंखे, रवींद्र चौधरी, राजेश चव्हाण, विजय खैरे, चंद्रकांत पाटील, संजय सपकाळे, अतुल चौधरी, उमेश पवार, ईश्वर पाटील, अनिल सोननी, दीपक वंजारी, संतोष पाटील आदींनी ही कारवाई केली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी