शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

लोंढ्रीतांड्यातील विषबाधित पशुधन धोक्यात : १७ जनावरे दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 16:52 IST

लोंढ्रीतांडा, ता.जामनेर येथे प्राथमिक अंदाजानुसार चाऱ्यातून विषबाधेने शनिवारी चार जनावरे दगावली. यानंतर उपचार सुरू झाले आहे. रात्र उलटत नाही तोच रविवारी पहाटेपासून पुन्हा १७ जनावरे मृत्यमुखी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे संपूर्ण तांड्यातील पशुधन धोक्यात आले असून मृृत जनावरांची संख्या वाढण्याची भीती आहे.

ठळक मुद्दे८० जनावरे बाधिततहसीलदारांकडून पंचनाम्याचे आदेशपशुवैद्यकीय अधिकारी तळ ठोकून

मनोज जोशी ।पहूर, ता.जामनेर : लोंढ्रीतांडा, ता.जामनेर येथे प्राथमिक अंदाजानुसार चाऱ्यातून विषबाधेने शनिवारी चार जनावरे दगावली. यानंतर उपचार सुरू झाले आहे. रात्र उलटत नाही तोच रविवारी पहाटेपासून पुन्हा १७ जनावरे मृत्यमुखी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे संपूर्ण तांड्यातील पशुधन धोक्यात आले असून मृृत जनावरांची संख्या वाढण्याची भीती आहे. तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी तळ ठोकून आहे. या घटनेच्या पंचनाम्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहे, तर संबंधित शेतीच्या मालकाने विष बाधेसंर्दभात प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने मृत जनावरांच्या निदानाचे आव्हान पशुवैद्यकीय अधिकाºयांसमोर निर्माण झाले आहे.पहूरपासून पाच किलोमीटर अंतरावरील लोंढ्री गावात तांडा वसाहत आहे. तांड्यातील सत्तर ते ऐंशी लहान मोठे जनावरांचा कळप शुक्रवारी दुपारी तांड्यापासून काही अंतरावर अशोक जयवंत काकडे यांच्या शेतात गुराख्याने जनावरे चारून संध्याकाळी गावात परत आणली.जनावरे शनिवारी बाधित उघडशनिवारी जनावरे तोंडातून फेस व फुगून येत असल्याचे शेतकºयांना निदर्शनास आले. उपचारापूर्वी शनिवार दुपारपर्यंत चार जनावरे दगावल्याने शेतकरी भयभीत झाले. याची कल्पना पशुवैद्यकीय अधिकाºयांना देण्यात आली. त्यानुसार तालुका पशुवैद्यकीय विकास अधिकारी डॉ.एस.एच.व्यवहारे पथकासह तांड्यात दाखल होऊन तत्काळ बाधित जनावरांवर उशिरापर्यंत उपचार सुरू केलेउपचारानंतर १७ जनावरे दगावलीतांड्यातील सुरेश राघो चव्हाण यांची १४ मोठी जनावरे बाधित झाली. या जनावरांवर शनिवारी रात्रीपासून उपचार सुरू आहे. पैकी दोन बैल व तीन गाय रविवारी दगावली असून नऊ जनावरे गंभीर आहेत. लालसिंग कन्हेराम चव्हाण यांची एक गाय, एक बैल मृत, तर दोन गंभीर, दीपक हंसराज चव्हाण यांची बैल जोडी, भुरालाल मोहनदास राठोड यांची एक म्हैस, एक बैल, मल्लू जयसिंग राठोड यांच्या दोन शेळ्या, हिवरसिंग गुलाब राठोड यांची एक बैलजोडी, बळीराम रामसिंग राठोड यांचा एक बैल, साईदास गबरू राठोड यांचा एक बैल मरण पावला आहे.प् १५ मोठी जनावरे व दोन शेळ्यांचा समावेश असून आतापर्यंत एकवीस जनावरे दगावली आहे. मात्र तांड्यातील चाळीस ते पन्नास जनावरे बाधित आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून यापैकी काही जनावरे मृत्यूूशी झुंज देत असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. यात तांड्यातील प्रत्येक शेतकºयांची दोन ते तीन जनावरांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे.पंचनाम्याचे आदेशतहसीलदार अरूण शेवाळे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली आहे. याचबरोबर मृत जनावरांचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठी स्वाती बांगर, ग्रामसेवक शीतल पाटील यांना दिले आहे. त्यानुसार पंचनामे सुरूआहे.पशुवैद्यकीय अधिकारी ठाण मांडूनतालुका पशुवैद्यकीय विकास अधिकारी डॉ.एस.एच.व्यवहारे, डॉ.डी.एच.पाटील, डॉ.जयलाल राठोड, डॉ.आर.आर.ठाकूर, डॉ.स्वप्नजा लोखंडे, डॉ.चंद्रकांत आव्हाड या पशुवैद्यकीय अधिकाºयांचे पथक उपचारासाठी ठाण मांडून आहे. मृुत जनावरांचे शवविच्छेदन करून त्यांच्या अवयवांचे नमुने फाँरेंसिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार चाºयातून विषबाधेने जनावरे दगावत असल्याचे या डॉक्टरांनी सांगितले. मात्र प्रमुख निदान शवविच्छेदनाच्या अहवालातून समोर येईल, असेही सांगितले आहे.जनावरांच्या मृत्यूचे निदान प्रश्नांकिततांड्यातील जनावरांना डॉक्टरांच्या प्राथमिक अंदाजानुसार, जनावरे चाºयातून विषबाधा झाल्याचे सांगितले आहे, तर शेतीमालक अशोक काकडे यांनी माझे व गावातील काही शेतकºयांची गुरे याचठिकाणी चरली आहेत. त्यांना काहीही झाले नाही. त्यामुळे काकडेंनी विषबाधेच्या कारणाविषयी साशंकता निर्माण केली. उपचारानंतरही बाधित जनावरे नियंत्रणात येत नाहीे. उपचाराला बाधित जनावरे प्रतिसाद देत नाही. त्यामुळे जनावरांच्या मृत्यूचे निदान पशुवैद्यकीय अधिकाºयांसाठी आव्हान ठरले आहे.घटनास्थळी धावमाजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांचे स्वीय साहाय्यक संतोष बारी, सभापती निता पाटील, पाळधीचे माजी सरपंच कमलाकर पाटील, सेवानिवृत्त अभियंता जे.के.चव्हाण, लोंढ्री येथील माजी सरपंच राजमल भागवत, पोलीस पाटील डॉ. सुभाष चिकटे यांच्यासह पदाधिकाºयांनी पाहणी केली आहे.मृत जनावरांच्या मृत्यूची कारण वेगळीसंबंधित शेतीमालक माझ्या शेतात कपाशी पीक होते. १५ दिवसांपासून माझे स्वत:चे गुरे तसेच लोंढ्री बुद्रूक व खुर्द गावातील काही शेतकºयांची गुरे कपाशीत चरली आहेत. त्यांना काहीही झाले नाही. शुक्रवारी कपाशी पिक उपटून काढले आहे. त्याच ठिकाणी या गुरांचा कळप चरलो आहे. मात्र या जनावरांच्या मृत्यूचे कारण वेगळे असू शकते.-अशोक जयवंत काकडे, शेतीमालक लोंढ्री बुद्रूक, ता.जामनेरशुक्रवारी जंगलात माझी १४ जनावरे चरण्यासाठी गेली. पैकी पाच जनावरे दगावली आहे. नऊ जनावरे गंभीर आहेत. रविवारी सकाळी डॉक्टरांना फोन केल्यावर डॉक्टर ११ वाजता घटनास्थळी उशिरा दाखल झाले.-सुरेश राघो चव्हाण, शेतकरी पशुधन नुकसानग्रस्त, लोंढ्री ताडा, ता.जामनेरदोन गायी शुक्रवारी चरून घरी आल्या. शनिवारी सकाळपासून गायी फुगून तोंडातून फेस आला व मरण पावल्या. डॉक्टरांना दुपारी दोन वाजता माहिती दिली. डॉक्टर दुपारी चार वाजता तांड्यात दाखल झाले.-छोटू रामदास चव्हाण, लोंढ्री तांडातांड्याातील शेतकºयांची लहान मोठी अशी ७० ते ८० जनावरे कपाशी उपटलेल्या शेतात शुक्रवारी दुपारी चारली. नंतर सायंकाळी तांड्यात कळप आणल्यावर गुरांना काहीही झाल्याचे दिसून आले नाही. शनिवारी जनावरे मरण पावली. घायाळ झाली आहे.-बंडू अमरू राठोड, गुराखी, लोंढ्री तांडासंबंधित शेतकºयांच्या दगावलेल्या जनावरांचे पंचनामे करून जिल्हाधिकाºयांकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे. मदतीसाठी जिल्हाधिकाºयांच्या पातळीवरून निर्णय घेण्यात येईल.-अरूण शेवाळे, तहसीलदार, जामनेरप्राथमिक अंदाजानुसार जनावरांना चाºयातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत जनावरांचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांच्या अवयवांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. शवविच्छेदनाच्या अहवालातून प्रमुख निदान निष्पन्न होईल. बाधित जनावरांच्या उपचारासाठी पथक तैनात आहे. उपचार सुरू आहे.-डॉ.एस.एच.व्यवहारे, तालुका पशुवैद्यकीय विकास अधिकारी, जामनेर 

टॅग्स :Farmerशेतकरी