महिलेला विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:19 IST2021-09-23T04:19:42+5:302021-09-23T04:19:42+5:30
जळगाव : गारखेड तांडा ता. जामनेर येथील सिंधू कैलास राठोड (वय ३०) या महिलेने विषारी द्रव्य प्राशन केल्याने तिला ...

महिलेला विषबाधा
जळगाव : गारखेड तांडा ता. जामनेर येथील सिंधू कैलास राठोड (वय ३०) या महिलेने विषारी द्रव्य प्राशन केल्याने तिला आधी जामनेरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. या महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
फवारणी करताना झाली विषबाधा
जळगाव : खडकी ता. जामनेर येथील गोपाल झावरसिंग राठोड (वय २०) हा तरुण शेतात कापसावर औषध फवारणी करत होता. त्यावेळी त्यातील विषारी द्रव्य त्याच्या चेहऱ्यावर उडाले. त्यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
इसमाने घेतले विष
जळगाव : नांद्रा ता. जळगाव येथील बाळू बुधा पाटील (वय ५२) यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. त्यामुळे त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये मोठी गर्दी जमली होती.
तरुणाला विषबाधा
जळगाव : येथील गणेश ईश्वर लोहाडे (वय ३८) रा. पळासखेडे मिराचे ता. जामनेर या तरुणाला विषबाधा झाली आहे. त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.