शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नातील जेवणातून ७० जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 23:11 IST

कढोली ता. एरंडोल येथे एका लग्न समारंभातील जेवणावळीतून गावातील ६० ते ७० जणांना विषबाधा झाली आहे.

ठळक मुद्देकढोली येथील घटना : ५ जणांना जळगावला हलविले

लोकमत न्यूज नेटवर्क 

जळगाव/ कढोली ता. एरंडोल : कढोली ता. एरंडोल येथे एका लग्न समारंभातील जेवणावळीतून गावातील ६० ते ७० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी घडला आहे. यामध्ये पाच जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना जळगाव जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात तीन जण  गंभीर आहेत. सायंकाळच्या सुमारास उपकेंद्रात रुग्णाची रांग लागली होती. 

कढोली गावात १६ फेब्रुवारी रोजी  भास्कर झावरु बडगुजर यांच्या मुलाच्या झालेल्या लग्नात जेवण केल्याने काही नागरिकांना १७ रोजी सकाळपासूनच उलट्या, मळमळ, जुलाब व पोटदुखीचा त्रास जाणवू लागला होता. दिवसभर गावातील काही नागरिकांना हा त्रास जाणवला. सायंकाळी तर अनेक नागरिकांना हा त्रास अधिकच जाणवू लागल्याने नागरिकांनी गावातील खाजगी डॉक्टरांकडे धाव घेतली.

हा प्रकार गावातील काही नागरिकांनी जिल्हा परिषदेचे सदस्य नानाभाऊ महाजन यांना कळविला. त्यांनी  तात्काळ रिंगणराव प्राथमिक आरोग्य केंद्राला घटनेची माहिती देऊन, कढोली गाठले. काही वेळातच रिंगणगाव येथुन सहा डॉक्टर व दहा नर्सचे पथक येऊन त्यांनी नागरिकांवर उपचार केले. यात अति प्रकृती खालावलेल्या ५ जणांना रूग्णवाहिकेने जळगावला आणण्यात आले.

तर अन्नातूनच विषबाधा झाल्याचा संशय

यावेळी डॉक्टरांनी गावातील नागरिकांना झालेल्या त्रासाची कारणे विचारली असता, त्यांनी लग्नात जेवल्यामुळेच हा त्रास जाणवत असल्याचे सांगितले. गावातील अनेकांन पोटदुखीचा व जुलाबाचा त्रास जाणवत असल्याने बु‌धवारी रात्री उशिरापर्यंत नागरिकांची तपासणी करण्यात येत असल्याचे नानाभाऊ महाजन यांनी सांगितले. विषबाधा झालेल्यांपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल भंगाळे यांनी ही माहिती दिली. मंगलाबाई गोकुळ बडगुजर यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. 

२२ तासांनी त्रास सुरु

लग्नात जेवण झाल्यानंतर  २२ तासाने हातपाय दुखणे थंडीताप व डोकेदुखी चक्कर आल्याने खाजगी डॉक्टरांकडून उपचार केला, असे कृष्णा बडगुजर यांनी सांगितले. लग्नासाठी पिंप्री ता. धरणगाव येथील सोमनाथ बडगुजर या स्वयंपाकीला बोलावण्यात आले होते, अशी माहिती मिळाली.

टॅग्स :JalgaonजळगावErandolएरंडोलmarriageलग्नfood poisoningअन्नातून विषबाधा