पो. बे. विद्यालयात विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:15 IST2021-07-25T04:15:18+5:302021-07-25T04:15:18+5:30

येथील पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालयाचा यावर्षीचा निकाल शंभर टक्के लागला असून ९९ टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ...

Po. Bay. Reception of students in the school | पो. बे. विद्यालयात विद्यार्थ्यांचा सत्कार

पो. बे. विद्यालयात विद्यार्थ्यांचा सत्कार

येथील पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालयाचा यावर्षीचा निकाल शंभर टक्के लागला असून ९९ टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरुवर्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी स्थानिक अध्यक्ष प्रा. भागवत महालपुरे, सरपंच भरत राठोड, विकासो चेअरमन बालू बोरसे, माजी मुख्याध्यापक देवीदास वाघ, शालेय समिती सदस्य मोहन बच्छे, माजी सरपंच डॉ. जे. एस. परदेशी, भातखंडे (ता. पाचोरा) येथील सरपंच तथा शेतकी संघाचे संचालक दिनेश पाटील उपस्थित होते. यावेळी प्रथम आलेल्या सानिया तडवी या विद्यार्थिनीस डॉ. जे. एस. परदेशी यांनी कौतुकाची थाप देऊन पाचशे रुपये बक्षीस दिले.

मुख्याध्यापक उत्तमराव मनगटे पाटील यांनी तर आभार प्राथमिकचे मुख्याध्यापक राहुल पाटील यांनी केले.

Web Title: Po. Bay. Reception of students in the school