पी.एम. पाटील यांचा मराठा समाजातर्फे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:14 IST2021-07-26T04:14:53+5:302021-07-26T04:14:53+5:30
धरणगाव : महाराष्ट्र प्रदेश सकल मराठा समाजाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. बापू जाधव यांच्या आदेशान्वये जळगाव जिल्हाध्यक्षपदी पी.एम. पाटील यांची ...

पी.एम. पाटील यांचा मराठा समाजातर्फे सत्कार
धरणगाव : महाराष्ट्र प्रदेश सकल मराठा समाजाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. बापू जाधव यांच्या आदेशान्वये जळगाव जिल्हाध्यक्षपदी पी.एम. पाटील यांची निवड झाल्याबद्दल सकल मराठा समाजातर्फे धरणगाव नगर परिषद येथे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, प्रबोधिनीचे धनराज व डॉ. डी.पी. पाटील, संचालक चंदन पाटील हे उपस्थित होते. याप्रसंगी मूकबधिर विद्यालय, लांडगे गल्लीतर्फे, मराठा पंच मंडळतर्फे, पाटील समाज पंच मंडळ, मेडिकल असोसिएशनतर्फे डॉ. धनंजय पाटील, महेश पाटील, सुहास पाटील यांनी पाटील यांचा सत्कार केला. पथराड येथील लोकमतचे वार्ताहर भगवान मराठे यांची प्रसिद्धीप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी महेश पवार यांची संजय गांधी निराधार समितीत निवड झाल्याबद्दल व सुहास पाटील यांची मेडिकल असोसिएशन कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
250721\img-20210725-wa0027.jpg
फोटो कॅप्शन : सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष पी. एम. पाटील यांचा सत्कार करतांना मराठा समाजाचे सर्व पदाधिकारी.
छाया: आर. डी. महाजन.