कुसुंब्याच्या पेट्रोल पंपावर लूट?
By Admin | Updated: October 24, 2015 00:06 IST2015-10-24T00:06:45+5:302015-10-24T00:06:45+5:30
अज्ञात दरोडेखोरांनी तालुक्यातील कुसुंबा येथील पेट्रोलपंपावर शुक्रवारी पहाटे सशस्त्र दरोडा टाकला.

कुसुंब्याच्या पेट्रोल पंपावर लूट?
धुळे : विजयादशमीच्या धामधुमीत पोलीस यंत्रणा व्यग्र असल्याची संधी साधून अज्ञात दरोडेखोरांनी तालुक्यातील कुसुंबा येथील पेट्रोलपंपावर शुक्रवारी पहाटे सशस्त्र दरोडा टाकला. तर पिंपळनेरला सामोडे रस्त्यावर असलेला अन्नपूर्णा पेट्रोल पंप व कुंडाणे शिवारातील पेट्रोल पंपावरही दरोडय़ाचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. मात्र, कुसुंब्याच्या घटनेबाबत तालुका पोलीस ठाण्यात मारहाणीची साधी तक्रार दाखल आहे. कुसुंबा शिवारातील पेट्रोल पंपावर गुरुवारी रात्री चार कर्मचारी डय़ुटीवर हजर होते. पहाटे 4.40 वाजेच्या सुमारास कारमधून आलेल्या 8 ते 10 दरोडेखोरांनी पेट्रोल पंपातील कॅबिनवर हल्ला केला. तेथील कर्मचा:यांना दरोडेखोरांनी दमदाटी करत लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. दरोडेखोरांनी कॅबिनमधील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश न आल्याने त्यांनी कर्मचा:यांकडे असलेली 35 ते 40 हजार रुपयांची रोकड हिसकावून पोबारा केला. कुंडाणेच्या पंपावरही प्रयत्न कुंडाणे शिवारातील पेट्रोल पंपावरही दरोडेखोरांनी लुटीचा प्रयत्न केला. मात्र, त्यात दरोडेखोरांना यश आले नाही. या पेट्रोल पंपाच्या शेजारी हॉटेल आहे. महामार्गावरील अनेक ट्रक, कार, खासगी आराम बसेस याठिकाणी थांबतात. लोकांची वर्दळ असल्याने दरोडेखोर पळून गेल्याची चर्चा आहे. पिंपळनेरपासून सुरुवात शुक्रवारी पहाटे 3.40 च्या सुमारास 3 ते 4 दरोडेखोरांनी पिंपळनेरातील सामोडे रस्त्यावरील अन्नपूर्णा पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. या दरोडेखोरांनी पंपावरील कर्मचा:यांना दमदाटी करून त्यांच्याकडून रोकडची मागणी केली. मात्र, सुदैवाने पंपावरील रोकड 2 वाजताच दुसरीकडे नेण्यात आली होती. सप्तशंृगीच्या गडावर जाणा:या भाविकांची रस्त्यावर वर्दळ असल्याने दरोडेखोर निसटले. पिंपळनेर, कुसुंबा व कुंडाणे या तिन्ही घटनांमधील दरोडेखोर एकच असावेत, अशी शक्यता आहे. गुन्हे शाखेचे पथक पोहोचले कुसुंबाच्या पेट्रोलपंपावर दरोडा पडल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक देवीदास शेळके कर्मचा:यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते.