शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

३५ लाख रुपये व एक किलो सोन्याच्या दागिन्यांच्या लालसेने रचला खुनाचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:16 IST

पती, पत्नीच्या खुनाचा झाला उलगडा : महिलेसह तिघांना केली अटक लोकमत न्यूज नेटवर्क आरोपींचे फोटो : २७ सीटीआर ३९ ...

पती, पत्नीच्या खुनाचा झाला उलगडा : महिलेसह तिघांना केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

आरोपींचे फोटो : २७ सीटीआर ३९ (सुधाकर पाटील), २७ सीटीआर ४० (देवीदास श्रीनाथ), २७ सीटीआर ४१ (अरुणाबाई वारंगणे)

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : व्याजाने घेतलेल्या १२ लाख रुपयांचा तगादा कायमचा मिटेल, त्याशिवाय पाटील दांपत्याकडे ३५ लाखांची रोकड व एक किलो सोन्याचे दागिने मिळतील, त्यातून सर्वांचीच आर्थिक चणचण दूर होईल या हेतूने मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दांपत्याचा खून झाल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी सुधाकर रामलाल पाटील (४०, चिंचखेडा, ता.जामनेर), देवीदास नामदेव श्रीनाथ (४०), अरुणाबाई गजानन वारंगणे (३०, रा. कुसुंबा, ता. जळगाव) या तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले व तपास पथक उपस्थित होते.

तालुक्यातील कुसुंबा येथे ओमसाई नगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दांपत्याचा बुधवारी रात्री खून झाला होता. गुरुवारी दुपारी ही घटना उघडकीस आली होती. अरुणाबाई हिने आशाबाईकडून बारा लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याशिवाय सुधाकर व देवीदास हेदेखील कर्जबाजारी होते. त्यातून सुटका मिळण्यासाठी त्यांनी कट रचून खून केला होता. प्रत्यक्षात तेथे ८५ हजारांची रोकड व तीन ते चार लाखांचे दागिने मिळाले. आशाबाई यांनी जास्तीचे दागिने याच भागात राहणारी आई रुख्माबाई पाटील यांच्याकडे ठेवले होते.