माता व बालकाचे प्राण वाचल्याने नातेवाईकांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
तालुक्यातील शहापुरे येथील स्वीटी अविनाश खरे या गरोदर मातेची अवस्था अतिशय गंभीर होती. त्यांना जळगावी जाण्याचा सल्ला मिळाला. रुग्णाचे सासरे अर्जुन खरे यांना कुठे जावे हे कळत नव्हते. त्यांचे शहरातील नातेवाईक अरुण ब्राह्मणे मदतीला धावून आले आणि त्यांनी ही बाब नंदू सोमवंशी, सचिन सोमवंशी यांना सांगितल्यावर सोमवंशी यांनी तात्काळ डॉ. वैभव सूर्यवंशी यांना विनंती करून रुग्णाची संपूर्ण जबाबदारी घेत उपचार करण्याची विनंती केली. सूर्यवंशी यांना एकप्रकारे आव्हान होते. रक्ताचे प्रमाण कमी आणि त्यात कमी होणाऱ्या प्लेटलेट त्यामुळे तत्काळ जळगाव येथून दोन प्लेटलेट्सच्या बॅग मागवणे आवश्यक होते तर मातेचा रक्तगट एबी पॉझिटिव्ह हा दुर्मिळ रक्तगट असल्याने मिळणे कठीण झाले होते. अशा अवस्थेत स्वीटी खरेची प्रसूतीची वेळ आली. रुग्णाचे ऑपरेशन करते वेळी योगायोगाने डॉ. सूर्यवंशी यांचा रक्तगट देखील एबी पॉझिटिव्ह असल्याने स्वतः डॉ. सूर्यवंशी यांनी रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी तात्काळ रक्तदान करण्याचा निर्णय घेत रक्तदान केले आणि आणि स्विटी खरेसह तिच्या बाळाचा जीव वाचविण्यास यश मिळविले. यावेळी हॉस्पिटलचे डॉ. मनोहर शिंपी, सुनीता पाटील, सोनी पाटील यांनी मदत केली. खरे परिवारासह पाचोरेकरांना डॉक्टर खरोखर देवरूपी असल्याचा प्रत्यय आला.
१५/९
140921\img_20210914_181955.jpg
प्राणांतिक यातना सोसून डॉक्टरांच्या रक्तदानामुळे मातृत्वाच्या आनंदात स्वीटी खरे