जळगावातील देवेंद्र नगरात प्ले स्कूलच्या संचालिकेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 23:10 IST2018-02-05T23:07:33+5:302018-02-05T23:10:52+5:30
शहरातील वाघ नगरातील फन प्ले स्कूलच्या संचालिका अंजली दिनेश थोरात (वय ४३, रा.देवेंद्र नगर, जळगाव) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी अडीच वाजता उघडकीस आली. अंजली यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.मात्र माहेरच्या लोकांनी संशय व्यक्त करुन पतीविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

जळगावातील देवेंद्र नगरात प्ले स्कूलच्या संचालिकेची आत्महत्या
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,५: शहरातील वाघ नगरातील फन प्ले स्कूलच्या संचालिका अंजली दिनेश थोरात (वय ४३, रा.देवेंद्र नगर, जळगाव) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी अडीच वाजता उघडकीस आली. अंजली यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.मात्र माहेरच्या लोकांनी संशय व्यक्त करुन पतीविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
मुलाने दरवाजा उघडताच आईचा मृतदेह दिसला...
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अंजली थोरात या पती दिनेश सुरेश थोरात व मुलगा श्रेयस (वय १०) यांच्यासह देवेंद्र नगरात राहत होत्या. सोमवारी पती एका कार्यक्रमानिमित्त मेहरुण येथे गेले होते तर मुलगा श्रेयस हा शाळेत गेलेला होता.
दुपारी अडीच वाजता मुलगा शाळेतून घरी आला तेव्हा दरवाजा उघडताच आई अंजली या गळफास घेतलेल्या स्थितीत लटकलेल्या होत्या. घाबरलेल्या श्रेयस याने दप्तर तसेच फेकून देत शेजारी धावत गेला.आईने गळफास घेतल्याचे शेजारच्यांना सांगितले. त्यामुळे शेजारच्या लोकांनी तत्काळ धाव घेतली असता त्या मयत स्थितीत आढळून आल्या. त्यांनी ही माहिती पती दिनेश यांना दिली तर काही जणांनी रामानंद नगर पोलिसांना कळविली.
चिठ्ठी किंवा संशयास्पद वस्तू नाही
घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक प्राची राजूरकर व किरण धनगर यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करताना त्यांनी काही संशयास्पद वस्तू मिळते का? याचा शोध घेतला, मात्र चिठ्ठी किंवा अन्य कोणती वस्तू आढळून आली नाही, त्यामुळे अंजली यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. चौकशी अंतीच कारण स्पष्ट होईल, असे राजूरकर यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.