नाटकाचे वेड लागताच योगेशचा प्रवास सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:59 PM2019-07-24T12:59:23+5:302019-07-24T12:59:50+5:30

यावल तालुक्यातील डांभूर्णी या छोट्या गावातला योगेश बाळासाहेब पाटील हा तरूण जळगावात शिकायला येतो, स्वत:ची वाट शोधण्याच्या प्रयत्नात नाटकाचं ...

As the play got crazy, the journey to Yogesh started | नाटकाचे वेड लागताच योगेशचा प्रवास सुरु

नाटकाचे वेड लागताच योगेशचा प्रवास सुरु

Next

यावल तालुक्यातील डांभूर्णी या छोट्या गावातला योगेश बाळासाहेब पाटील हा तरूण जळगावात शिकायला येतो, स्वत:ची वाट शोधण्याच्या प्रयत्नात नाटकाचं वेड लागतं आणि सुरु होतो त्याचा प्रवास...
शेतीत राबणाऱ्या, कष्ट करणाºया कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या योगेशची मातीशी जुळलेली नाळ. उत्तम वाचक आणि मित्रांच्या मदतीसाठी धावणाºया योगेशची नॅशनल स्कूल आॅफ ड्रामाच्या टी. आय. ई. च्या अभ्यासक्रमासाठी भारतभरातून आलेल्या विद्यार्थ्यांमधून निवड होते ही अभिमानाची गोष्ट आहे. भारतभरातून फक्त २० विद्यार्थ्यात महाराष्ट्रातून एकमेव योगेशची निवड झालीय. यानिमित्ताने राष्ट्रीय स्तरावरच्या नाटकांचा अभ्यास करण्याची उत्तम संधी त्याला मिळणार आहे.परिवर्तन आयोजित पुरूषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत त्याला पारितोषिकं आहेत. मु.पो. कळमसरा ही एकांकिका तर अफलातून होती. लहान मुलात व मोठ्यांमध्ये सहज रमणारा व त्यांच्याकडून चांगली निर्मिती करून घेणारा हा कसदार दिग्दर्शक आहे. शॉर्ट फिल्म बनवणे, हेही त्याच्या आवडीच. सध्या महाराष्ट्रभर गाजत असलेल्या नली नाट्याच उत्तम दिग्दर्शन त्यानं केलंय. जयंत पवार सारख्या मोठ्या नाट्य समिक्षकाने त्याच्या दिग्दर्शनाचं कौतुक केलंय. जिथे नंबर लावण्यासाठी विद्यार्थी धडपडत असतात अशा नाटकाच्या इन्स्टीट्युटध्ये योगेशची निवड हे अभिमानास्पद आहे.
-हर्षल पाटील, रंगकर्मी़, जळगाव.

Web Title: As the play got crazy, the journey to Yogesh started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव