वृक्षारोपण सप्ताहाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:21 IST2021-08-13T04:21:32+5:302021-08-13T04:21:32+5:30

जळगाव - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना तालुका पदाधिकाऱ्यांकडून जळगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये वृक्षारोपण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले ...

Plantation Week concludes | वृक्षारोपण सप्ताहाचा समारोप

वृक्षारोपण सप्ताहाचा समारोप

जळगाव - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना तालुका पदाधिकाऱ्यांकडून जळगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये वृक्षारोपण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. फुपणी, भोकर, कठोरा, भादली, सावखेडा या गावांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. फुफणी गावाचे माजी सरपंच डॉ.कमलाकर पाटील यांच्या पुढाकाराने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

बाजार समितीत मुगाला ७ हजारांचा भाव

जळगाव - शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारपासून मुगाचा भाव लिलावाव्दारे जाहीर करण्यात आला आहे. मुगाला यावर्षी प्रतिक्विंटल ७ हजार ११ रुपये इतका भाव जाहीर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीमध्ये विक्रीस आणून लिलाव प्रक्रियेत भाग घेऊन चांगला भाव घेण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी यांनी केली आहे.

प्रशांत सुरळकर यांची निवड

जळगाव - महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा जिल्हापूर्वचे अध्यक्ष प्रशांत सुरेश सुरळकर यांची नाशिक विभाग तेली समाजाच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा या संस्थेच्या नावात बदल झाला असून प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्य असे नामकरण करण्यात आले आहे. प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी यांनी प्रशांत सुरळकर यांना प्रदेश तेली युवक महासंघ नाशिक विभागाच्या कार्याध्यक्ष पदावर नियुक्तीपत्र दिले.

Web Title: Plantation Week concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.