प्रताप माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:12 IST2021-06-26T04:12:27+5:302021-06-26T04:12:27+5:30
महिंदळे, ता. भडगाव : दि शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप माध्यमिक विद्यालय वडगाव बुद्रूक येथे वटसावित्री पौर्णिमेचेनिमित्त साधून भडगाव ...

प्रताप माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण
महिंदळे, ता. भडगाव : दि शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप माध्यमिक विद्यालय वडगाव बुद्रूक येथे वटसावित्री पौर्णिमेचेनिमित्त साधून भडगाव पंचायत समिती सभापती डॉ. अर्चना पाटील यांच्या हस्ते वटवृक्षांची लागवड करण्यात आली. वटसावित्री पौर्णिमानिमित्त भडगाव पंचायत समिती सभापती यांनी प्रताप माध्यमिक विद्यालयात १० वटवृक्षांची रोप व १५ इतर वृक्षांची रोपे दिली व रोपांची लागवडच न करता त्याचे संगोपनही गरजेचे आहे, असा सल्लाही दिला.
यावेळी गावातील सरपंच अजय गायकवाड, रामलाल पाटील, उपसरपंच सविता पाटील, सदस्य उर्मिला माळी, शारदा माळी, ललिता पाटील, कल्पना वाघ, वडगाव खुर्द सरपंच विजयसिंग पाटील, या सर्व ग्रामपंचायत नवनियुक्त सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा सत्कार व प्रतिष्ठित नागरिक यांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक पी. एल. पाटील यांनी केला. तसेच विद्यालयातील शिक्षक रणजित सोनवणे यांच्या स्वलिखित पुस्तकाचे प्रकाशन झाले. व वसतिगृह कर्मचारी देवीदास शिंदे यांनी वृक्षाचे संगोपन चांगले केल्याबद्दल त्यांचा सत्कार सभापती अर्चना पाटील यांनी केला. याप्रसंगी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एस.के. राठी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एल. पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वसतिगृह अधीक्षक भिकन जाधव व कर्मचारी बंधूंनी परिश्रम घेतले.
फोटो कॅप्शन.
प्रताप माध्यमिक विद्यालय वडगाव येथे वृक्षारोपण करताना सभापती अर्चना पाटील व ग्रामपंचायत पदाधिकारी