मैढ क्षत्रिय सुवर्णकार युवक मंडळातर्फे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:14 IST2021-06-25T04:14:01+5:302021-06-25T04:14:01+5:30
जळगाव - श्री मैढ क्षत्रिय सुवर्णकार युवक मंडळातर्फे गुरुवारी पोलीस कवायत मैदान येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पोलीस ...

मैढ क्षत्रिय सुवर्णकार युवक मंडळातर्फे वृक्षारोपण
जळगाव - श्री मैढ क्षत्रिय सुवर्णकार युवक मंडळातर्फे गुरुवारी पोलीस कवायत मैदान येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रामरतन वर्मा,जिल्हा अध्यक्ष पन्नालाल वर्मा व शहर अध्यक्ष ॲड. के.बी.वर्मा, महिला मंडळाची सचिव कल्पना वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात डॉ. मुंढे यांनी वृक्षाचे महत्त्व सांगून त्यांना कोरोना काळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आलेले अनुभव कथन केले.
५० वृक्षांची लागवड
मंडळाच्यावतीने ५० वृक्षांची लागवड पोलीस कवायत मैदान येथे करण्यात आली. त्यात प्रामुख्याने वट, निंब, चिंच, पिंपळाची झाडांचा समावेश आहे. कार्यक्रमात पुष्पा वर्मा. जयश्री कडेल, उज्ज्वला वर्मा, मोहनलाल वर्मा, विजय वर्मा, कन्हैयालाल वर्मा, चंपालाल सोनी,उत्तमचंद वर्मा, सुजीत वर्मा, पारस सोनी, सुरज वर्मा, किशोर वर्मा, धिरज वर्मा आदी उपस्थित होते. सूत्र संचालन व आभार प्रदर्शन धनेश वर्मा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय सोनी, भरत वर्मा, ओमप्रकाश सोनी, पंकज वर्मा यांनी परिश्रम घेतले.