शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवशी केले जाते वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 23:50 IST

कासोदा येथे ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे, त्यांच्या घरी जाऊन एक रोप भेट द्यायचे. त्यांच्याच हस्ते लावायचे. संगोपनाची जबाबदारीदेखील त्यांच्यावरच सोपवायची. पुढील वाढदिवसाला हे रोप जगले, किती मोठे झाले, हे पहायला ग्रीन आर्मीचे सदस्य पुन्हा येतील. हे बजवायचे. असा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देएरंडोल तालुक्यातील कासोदा येथे स्तुत्य उपक्रमग्रीन आर्मी ग्रुपने घेतला पुढाकारनागरिकांचाही मिळतोय प्रतिसाद

प्रमोद पाटीलकासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथे ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे, त्यांच्या घरी जाऊन एक रोप भेट द्यायचे. त्यांच्याच हस्ते लावायचे. संगोपनाची जबाबदारीदेखील त्यांच्यावरच सोपवायची. पुढील वाढदिवसाला हे रोप जगले, किती मोठे झाले, हे पहायला ग्रीन आर्मीचे सदस्य पुन्हा येतील. हे बजवायचे. असा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम इतका भावतो आहे की, परिसरातील अनेक गावात ह्या ग्रीनआर्मी ग्रुपचे झपाट्याने अनुकरण सुरू झाले आहे. वर्षभरात गावातील प्रत्येक घरापुढे एक झाड जगलेले दिसेल असा प्रयत्न आहे, तेही शासनाचा एक नया पैसा न खर्च करता...गावातील काही ज्येष्ठ व तरुण मित्रांनी एकत्रित येऊन वाढदिवसाला वृक्षारोपणाची कल्पना सुचवली. यासाठी कासोदा ग्रीन आर्मी या नावाने आधी व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप बनवला. हा ग्रुप तयार करण्याबाबत आधी प्रचार प्रसार केला. उद्देश लोकांना कळविण्यात आला. एक अ‍ॅप बनवून स्वेच्छेने सभासद व्हा, असे आवाहन करण्यात आले. या ग्रुपला एकाच दिवसात मोठा प्रतिसाद मिळाला. २५६ सभासद काही तासातच जुळले. यामुळे आयोजकांचा उत्साह वाढला. गावातील देशविदेशात असणारे सामान्य नागरिक व उच्चपदस्थ सगळेच एका ग्रुपवर दिसू लागले. विचारांची देवाणघेवाण सुरु झाली.ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे, त्याला फोन करुन शुभेच्छा द्यायच्या व आम्ही तुमच्या घरी रोप देऊन सत्कार करायला येत आहोत. किती वाजेला यायचे ते कळवा. खड्डा पण खोदून ठेवा, असा निरोप दिला जातो. ठरल्याप्रमाणे ज्या सभासदांना शक्य होते ते १० ते १५ लोक संबंधित व्यक्तीकडे जातात. रोप लाऊन जगवायची हमी घेऊन परतात. दि.३१ मेपर्यंत सुमारे ५० घरांसमोर रोपं लावण्यात आली आहेत. गावकऱ्यांचा इतका मोठा प्रतिसाद मिळत आहे की, उद्या कुणाचा वाढदिवस आहे हे आदल्या दिवशी या ग्रुपला माहिती कळवली जाते. काही नागरिक स्वत:च रोप लाऊन या ग्रुपला फोटो शेअर करीत आहेत.या ग्रुपची लिंक इतर व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर फिरत असल्याने अनेकांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत, पण काही गावांनी यापासून प्रेरणा घेऊन आपल्या गावाच्या नावाने ग्रीनआर्मी असा उपक्रम सुरू केला आहे.याकामी काही दानशूर व्यक्तींनी ट्रीगार्ड देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हा उपक्रम येथे इतका लोकप्रिय होत आहे की, जि.प.च्या अध्यक्षा उज्वला पाटील वाढदिवसाला त्यांच्या घरासमोर रोप लावण्यासाठी फक्त अर्ध्या तासासाठी गावी आल्या होत्या. रोप लाऊन लागलीच जळगावी परतल्या होत्या.झाडांची रोपं काही लोक भेट देत आहेत. ट्रीगार्ड पण लवकरच प्राप्त होणार आहेत. त्यामुळे कोणताही पैसा खर्च न करता हे जनहिताचे मोठे काम होऊ पहात आहे.सरकार वृक्ष लागवडीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. पण पाहिजे तेवढा प्रतिसाद दिसत नाही. पण अतिशय छोट्याशा या उपक्रमातून कुठलाही पैसा खर्च न होता ४० हजार लोकसंख्येचे हे गाव ग्रीन सीटी म्हणून ओळखले जावे व कासोदा पॅटर्न म्हणून या उपक्रमाला पाठिंबा मिळावा, अशी तळमळ आयोजकांना आहे.पण हे करीत असताना या ग्रुपमधील व्यावसायीक, नोकरदार, शेतकरी, शेतमजूर सारेच आपला अतिशय मोलाचा वेळ देत आहेत. त्यामुळे हे शक्य होत आहे. ही चळवळ यशस्वी होऊन गाव, तालुका, जिल्हा ग्रीनसीटी म्हणून ओळखला जावा, असा प्रयत्न सुरू आहे. 

टॅग्स :environmentवातावरणErandolएरंडोल