भोपाळहून अपहरण झालेल्या विमानाचे जळगावला लँडिंग..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST2021-09-09T04:22:54+5:302021-09-09T04:22:54+5:30

नागर विमानतळ सुरक्षा ब्युरो व सरकारच्या सूचनेनुसार बुधवारी जळगाव विमानतळावर ‘मॉक ड्रील’ विमान अपहरणाचा सराव यशस्वीरीत्या पार पडला. यावेळी ...

The plane hijacked from Bhopal landed at Jalgaon. | भोपाळहून अपहरण झालेल्या विमानाचे जळगावला लँडिंग..

भोपाळहून अपहरण झालेल्या विमानाचे जळगावला लँडिंग..

नागर विमानतळ सुरक्षा ब्युरो व सरकारच्या सूचनेनुसार बुधवारी जळगाव विमानतळावर ‘मॉक ड्रील’ विमान अपहरणाचा सराव यशस्वीरीत्या पार पडला. यावेळी विमान अपहरण होण्याच्या, विमान अपहरणाच्या वेळी काम करणाऱ्या सुरक्षा संबंधित एजन्सी, महाराष्ट्र पोलीस, बॉम्ब शोध व डिस्पोजल पथक, एअरलाइन्स, आयबी, एसआयडी, एमएसएफ, अग्निशमन सेवा, वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भारत दूरसंचार विभाग व वन विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते.

इन्फो :

दोन तास चालले मॉक ड्रिल :

विमानतळावर हे संपूर्ण मॉक ड्रिल दोन तास चालले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली मॉक ड्रिलबाबत त्रुटी, सूचना यांची चर्चा करण्यात आली. त्या सुधारण्यासाठी संबंधित विभागप्रमुखांना सूचित करण्यात आले. मॉक ड्रिलचे संचालन अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक प्रताप शिकरे आदींनी यशस्वीरीत्या संयोजन केले. यावेळी विमानतळाचे संचालक सुनील मुगरीवार, डॉ. जयप्रकाश रामानंद, जितेंद्र महाजन, हर्षल महाजन, नीलेश वतपाल, अश्पाक पिंजारी, संदीप महाजन, अमोल पंडित, मौजोदीन शेख आदी विमानतळावरील कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: The plane hijacked from Bhopal landed at Jalgaon.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.