मालवाहू रिक्षाच्या धडकेत पिंप्रीचा शेतकरी ठार

By Admin | Updated: June 6, 2017 15:27 IST2017-06-06T15:27:38+5:302017-06-06T15:27:38+5:30

राष्ट्रीय महामार्गावर 50 फुट नेले फरफटत

Pimpri farmer killed in cargo rickshaw | मालवाहू रिक्षाच्या धडकेत पिंप्रीचा शेतकरी ठार

मालवाहू रिक्षाच्या धडकेत पिंप्रीचा शेतकरी ठार

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.6 - मागून येणा:या मालवाहू रिक्षाने जोरदार धडक दिल्याने भिका देवराम पाटील (वय 56 रा.पिंप्री.प्र.चा.ता.एरंडोल) हे सायकलस्वार शेतकरी ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे सात वाजता महामार्गावर पिंपळकोठा गावाजवळील दग्र्याजवळ घडली. यावेळी रिक्षा चालकाने पाटील यांना तब्बल 40 फुट फरफटत नेले.
सोमवारी रात्री पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतात पाण्याची किती ओल गेली आहे हे पाहण्यासाठी भिका पाटील मंगळवारी सकाळीच सायकलने शेतात गेले होते. तेथून परत येत असताना ते महामार्गावर कडेला साईडपट्टीच्याखाली चालत असताना जळगावकडून येणा:या मालवाहू रिक्षाने (एम.एच.19 बी.एम.5497) सायकलस्वार पाटील यांना जोरदार धडक दिली. त्यात सायकलचे हॅँडल तुटून त्याचा पाईप पाटील यांच्या गुप्त भागात घुसला. या अपघातानंतर रिक्षा चालकाने जागेवरच रिक्षा सोडून पळ काढला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुलगा तसेच गावातील लोकांनी पाटील यांना जिल्हा रुग्णालयात आणले. उपचार सुरु असताना 11 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 

Web Title: Pimpri farmer killed in cargo rickshaw