तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी पिंप्राळा गेट दोन तास बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:13 IST2021-07-10T04:13:21+5:302021-07-10T04:13:21+5:30
तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी पुढील आठवड्यात मेगा ब्लॉक जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे भादली ते जळगावच्या दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे ...

तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी पिंप्राळा गेट दोन तास बंद
तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी पुढील आठवड्यात मेगा ब्लॉक
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे भादली ते जळगावच्या दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू असून, हे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाच्या पार्शभूमीवर रेल्वे प्रशासनातर्फे पुढील आठवड्यात मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकसाठी रेल्वे प्रशासनातर्फे तयारी सुरू असून, शनिवारी मुंबईतील रेल्वेचे अधिकारी जळगावला येऊन ब्लॉकबाबत स्थानिक अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तांत्रिक कामामुळे मुंबईकडून येणाऱ्या गाड्यांना विलंब
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे चाळीसगाव ते जळगाव दरम्यान विविध ठिकाणी तांत्रिक कामे सुरू आहेत. यामुळे मुंबईकडून येणाऱ्या अनेक विलंबाने येत आहेत. परिणामी, यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे, तरी रेल्वे प्रशासनाने ही कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे. दरम्यान, या कामासांठी मोठ्या संख्येने परप्रांतीय बांधव या ठिकाणी आले आहेत.