शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

पिकांच्या भवितव्यासाठी ‘पायलट’ होणार शेतकऱ्यांचे मित्र! ड्रोनद्वारे औषध फवारणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 17:47 IST

...त्यामुळे प्रत्येक हंगामातील पिकांचे भवितव्य आता ड्रोनच्या पायलटच्या हाती असणार आहे आणि हाच पायलट आता शेतकऱ्यांचा जीवलग मित्र ठरणार आहे.

कुंदन पाटील -जळगाव : पिकांवर ‘ड्रोन’द्वारे औषध फवारणी करण्यासाठी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने १० पिकांसाठी मसुदा जाहीर केला आहे.त्यात कापसाचाही समावेश आहे.औषधांची  फवारणी करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी मान्यता दिलेला पायलट आणि ड्रोनचा वापर करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक हंगामातील पिकांचे भवितव्य आता ड्रोनच्या पायलटच्या हाती असणार आहे आणि हाच पायलट आता शेतकऱ्यांचा जीवलग मित्र ठरणार आहे.गेल्या आठवड्यात नवी दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याहस्ते १० पिकांसाठी तयार करण्यात आलेल्या ड्रोनद्वारे औषध फवारणीचा मसुदा प्रकाशित करण्यात आला. त्यात कापूस, सोयाबीन, ऊस, गहू, भात, मका, भुईमूग, तूर, करडई, तीळ या दहा पिकांचा समावेश आहे. या पिकांवर ड्रोनद्वारे औषधांची फवारणी करण्याची कार्यपद्धती निश्चीत करण्यात आली आहे.तसेच ड्रोनद्वारे फवारणी करताना पायलटवर जबाबदारीही निश्चीत करण्यात आली आहे. या फवारणीसाठी प्रमाणित औषधांचीच फवारणी करता येणार आहे.या मसुद्याच्या निश्चीतसाठी देशभरातील तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली होती. त्यात महाराष्ट्रातून परभणीच्या ‘वनामकृ’ विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.इंद्रमणी, राहुरी कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ.सुनील गोरंटीवार यांचा समावेश होता.पर्यावरणाचेही रक्षणड्रोनद्वारे फवारणी करताना शिवारातील किडी आणि पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, यासाठी फवारणीचा भाग निश्चीत करावा लागणार आहे.तसेच प्राथमिक उपचार साधनेही उपलब्ध ठेवावी लागणार आहेत.ड्रोन उडविण्याची पद्धत आणि उंचीही निश्चीत करण्यात आली आहे. सकाळी किंवा सायंकाळी ड्रोनद्वारे केलेली औषध फवारणी लाभदायी ठरते, अशी शिफारसही या समितीने केली आहे.रोजगाराची संधीदरम्यान, देशभरातील शेती व्यवसायात फवारणीसाठी प्रशिक्षीत पायलट आवश्यक असणार आहेत. त्यामुळे या क्षेत्रात शिक्षण आणि प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या क्षेत्रात पाऊल टाकताना त्यांना मात्र तांत्रिक, कृषी कौशल्य अवगत करावे लागणार आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीpilotवैमानिक