शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पिकनिक पॉईंट - गांधीतीर्थ (जळगाव)

By admin | Updated: July 8, 2016 08:54 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्रावर आधारलेले जगातील पहिले आॅडीओ गाईडेड म्युझियम व संशोधन केंद्र 'गांधीतीर्थ' जळगावमध्ये आहे.

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. ८ -  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्रावर आधारलेले जगातील पहिले आॅडीओ गाईडेड म्युझियम व संशोधन केंद्र 'गांधीतीर्थ' जळगावमध्ये आहे.  रेल्वे स्टेशनपासून आठ कि.मी. अंतरावर हे गांधीतीर्थ आहे.  याचे लोकार्पण तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील यांच्या हस्ते २५ मार्च २०१२ रोजी करण्यात आले होते. देश-विदेशातील पर्यटक येथे भेट देत असतात. या संशोधन केंद्रात ९ हजार ३१६ पुस्तके, ५ हजार पिरॉडिकल्स, १५२ आॅडीओ स्पीचेस, ८५ चित्रपट, १५ हजार फोटोग्राफ्स् ज्यात गांधीजी व विनोबा भावे यांचे आहेत. ११९ देशांनी प्रकाशित केलेली टपाल तिकिटे, ३ लाख ५२ हजार ९५९ स्कॅन दस्ताऐवज, ४ हजार ३१४ ई बुक्सचा ९ लाख ५० हजार पानांचा डाटा असा अमर्याद माहितीचा दुर्मीळ संग्रह संकलित करून कायमस्वरूपी जतन करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भारत सरकारच्या नॅशनल आर्काईव्ज या आंतरराष्ट्रीय केंद्रासह अनेक राष्ट्रीय संस्था व व्यक्तींकडील लाखो दस्ताऐवज गांधी रिसर्च फाउंडेशन डिजीटलाईज केलेले आहेत. तसेच महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या महाभ्रमण मध्येही गांधी रिसर्च फाउंडेशनचा महाराष्ट्र शासनाने समावेश केलेला आहे.गांधी तीर्थ हे जोधपूर येथील दगडांपासून तज्ज्ञ वैज्ञानिकांच्या मार्गदर्शनाने निर्मिती करण्यात आली आहे. शांततामय, प्रदूषणमुक्त व सर्वत्र हिरवळयुक्त अशा नैसर्गिक सौंर्द्याने सजलेल्या जैन हिल्सवर हे संग्रहालय आहे. २०१३-१४ मध्ये ग्रिहा आदर्श तथा आर्टिस्ट इन कॉँक्रिट अवॉर्ड एशिया फे स्टिव्हलमध्ये विजेता भवन म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच लीड इंडिया द्वारा ग्रीन बिल्डींग प्लॅटिनम श्रेणीतही पारितोषिक प्राप्त झाले आहे. संग्रहालयात सूत काढत असतानाचा महात्मा गांधी यांचा हुबेहुब पुतळा असून संपूर्ण संग्रहालय पाहायला २.३० ते ३ तास लागतात. २५० पे्रक्षकांच्या क्षमतेची सुविधायुक्त रंगभूमी असून घोडेस्वारी, बैलगाडी, बॅटरीवर चालणारी कार आणि नौकाविहाराचे अतिरिक्त आकर्षण आहे.