जळगाव- वाघनगर परिसरातील शामनगरामधील सचिन प्रकाश सोनवणे हा तलवार बाळगून दहशत माजवित असल्यामुळे सुज्ञ नागरिकांनी त्याचा तलवारीसोबतचा फोटो पोलिसांना पाठवताच पोलिसांनी बुधवारी त्याला सावखेडा शिवारातून तलवारीसह अटक केली आहे. याप्रकरणी आर्मअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शामनगरातील सचिन सोनवणे हा तलवार घेऊन फिरत असल्याचा फोटो सुज्ञ नागरिकाने मोबाईलमध्ये कैद केला होता. हा फोटा त्या व्यक्तीने सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ़ निलाभ रोहन यांना पाठविला. रोहम यांनी लागलीच स्थानिक गुन्हे शाखा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बापुसाहेब रोहम यांना तलवार बाळगणा-या इसमाचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार रोहम यांच्या पथकातील चंद्रकांत पाटील, श्रीकृष्ण पटवर्धन, दिनेश बडगुजर, सुनील दामोदर, विनयकुमार देसले, संदीप साळवे, जयंत चौधरी, नरेंद्र वारुळे, ललिता सोनवणे यांनी बुधवारी वाघनगर गाठले़ नंतर सचिन सोनवणे याला शामनगरातून अटक केली. दरम्यान, तलवारीबाबत विचारपूस केल्यानंतर सावखेडा शिवारातील काटेरी झुडपात त्याने तलवार लपविल्याचे सांगितले़ पथकाने त्याठिकाणाहून तलवार जप्त केली आहे.
पोलिसांना पाठविला त्याचा तलवारीसोबतचा फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 23:41 IST
तलवार बाळगणाऱ्यास अटक : तलवार जप्त
पोलिसांना पाठविला त्याचा तलवारीसोबतचा फोटो
ठळक मुद्देआर्मअॅक्टनुसार गुन्हा दाखलसावखेडा शिवारातून तलवारीसह अटक