शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

७०-३० कोटा रद्द करण्‍याच्या परिपत्रका विरोधात खंडपीठात याचिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 21:14 IST

जळगाव : महाराष्ट्र शासनाने ७ सप्टेंबर रोजी अचानक परिपत्रक काढून वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया विभागानूसार ७०/३० कोटा आरक्षण प्रक्रिया रद्द ...

जळगाव : महाराष्ट्र शासनाने ७ सप्टेंबर रोजी अचानक परिपत्रक काढून वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया विभागानूसार ७०/३० कोटा आरक्षण प्रक्रिया रद्द केली. हा निर्णय पारित करण्यापूर्वी कोणतीही पूर्वसूचना अथवा कल्पना विद्यार्थ्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे शासनाच्या परिपत्रकाला औरंगाबाद खंडपीठामध्ये पराग शरद चौधरी व इतर विद्यार्थी यांनी अ‍ॅड.शिवराज पाटील व अ‍ॅड.अनिकेत चौधरी यांचेमार्फत याचिका दाखल करून आव्हान दिले आहे.या याचिकेची सुनावणी ही २२ रोजी न्यायमूर्ती एस.व्ही.गंगापूरवाला व न्यायमूर्ती एस.डी.कुलकर्णी यांच्यासमोर झाली. न्यायालयाने प्रतिवादी असणा-या महाराष्ट्र शासनाला आपले म्हणणे सादर करण्यासाठी दोन आठवड्याची मुदत दिली आहे. आता पुढील कामकाज ६ ऑक्टोंबर रोजी होणार आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड.शिवराज पाटील व अ‍ॅड.अनिकेत चौधरी आणि राज्य शासनाच्या वतीने अ‍ॅड.डि.आर.काळे यांनी युक्तिवाद केला.असे आहेत याचिकेतील ठळक मुद्दे- ७०/३० कोटयाप्रमाणे वैद्यकीय प्रवेश दिल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासी ठिकाणापासून जवळच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्राधान्य दिले जाते.- गत सहा महिन्यांपासून कोरोना (कोव्हीड-१९) परिस्थितीमध्ये विद्यार्थी हे गोंधळलेले असतांना राज्यभरातील विद्यार्थ्यांनी ७०/३० प्रमाणे परिक्षेची पूर्वतयारी केलेली होती.- कॅबिनेट मंत्री अमित देशमुख हे लातूर जिल्ह्यातील असून केवळ राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून घाईने हा निर्णय त्यांनी घेतला.- महाराष्ट्र शासनाने २०१६मध्ये नागपूर खंडपीठामध्ये ७०/३० प्रक्रियेचे समर्थन केले होते.या मुद्यांसह दिनांक ७ रोजी पारित केलेले परिपत्रक रद्द करण्यात यावे व वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ७०/३० विभागीय कोटा प्रमाणे देण्यात यावे ही विनंती करण्यात आली. याचिकेची पुढील सुनावणी दिनांक ६/१०/२०२० रोजी होणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव