रॅगींग प्रकरणी वैयक्तिक चौकशी निष्फळ
By Admin | Updated: September 22, 2015 23:57 IST2015-09-22T23:57:29+5:302015-09-22T23:57:29+5:30
हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील रॅगींग प्रकरणी औरंगाबादच्या समितीने विद्याथ्र्याचे जबाब नोंदवले. मात्र समितीला समाधानकारक माहिती मिळू शकली नाही.

रॅगींग प्रकरणी वैयक्तिक चौकशी निष्फळ
धुळे : भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या रॅगिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी औरंगाबाद येथील समिती सोमवारी रात्री उशिरा धुळ्यात दाखल झाली होती. या समितीने विद्याथ्र्याचे जबाब नोंदवले. परंतु मानसिक दबावाखाली असलेल्या विद्याथ्र्यानी समाधानकारक माहिती न दिल्याने ही समितीदेखील रिकाम्या हातीच परत गेली. तर दुसरीकडे पोलिसांनी मंगळवारी विद्याथ्र्याना बोलते करण्यासाठी बंद खोलीत जबाब नोंदवण्यास सुरुवात केली. मात्र, पुरावे मिळत नसल्याने या प्रकरणाचा गुंता वाढला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 1 ते 10 सप्टेंबर दरम्यान एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्याथ्र्याची काही वरिष्ठ सहका:यांनी रॅगिंग केल्याची तक्रार अज्ञात विद्याथ्र्याने ईमेलद्वारे थेट भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडे केली होती. त्यानंतर विज्ञान परिषदेने नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाला सविस्तर चौकशीचे आदेश दिले होते. विद्यापीठाने दोन सदस्यीय चौकशी समिती गठित केली होती. या आधी महाविद्यालयाने आपल्या स्तरावर चार प्राध्यापकांची समिती गठित करून चौकशी केली होती. त्यात प्रथमदर्शनी रॅगिंग झाल्याचे आढळून आले होते. म्हणून महाविद्यालयाकडून याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र माळी यांनी मंगळवारी महाविद्यालयातील 17 ते 18 विद्याथ्र्याचे बंद खोलीत वैयक्तिक जबाब नोंदवले. मात्र, प्रत्येक विद्यार्थी असा प्रकार झाल्याचे माहिती नाही, माङयासोबत काहीही झाले नाही, अशी उत्तरे देत असल्याने पोलिसांसमोर पेच कायम आहे. महाविद्यालय प्रशासन अनभिज्ञ सोमवारी रात्री उशिरार्पयत औरंगाबादच्या समितीने धुळ्यात येऊन विद्याथ्र्याचे जबाब नोंदवले. मात्र, अधिष्ठाता डॉ.सुधीरकुमार गुप्ता यांच्यासह प्रमुख अधिकारी याविषयी अनभिज्ञ होते. समिती आल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. सखोल चौकशी होणार एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रथम फेरीत धुळ्यातील महाविद्यालयात संधी मिळालेल्या काही विद्याथ्र्यानी दुस:या व तिस:या फेरीनंतर लातूर, सोलापूर, नागपूर या ठिकाणी प्रवेश घेतल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे धुळ्यातून बाहेर गेलेल्या विद्याथ्र्याचीही पोलीस माहिती काढत आहेत. या विद्याथ्र्याचेदेखील जबाब नोंदवले जाणार आहेत.