शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

जळगाव मनपा क्षेत्रात मद्य विक्रीला परवानगी, प्रतिबंधित क्षेत्रात बंदी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 12:32 PM

वाईन शॉपसह परमिट रुम, बारमधूनही करता येणार सीलबंद मद्यविक्री

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दरम्यान मनपा क्षेत्रात बंद असलेली मद्य विक्री प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतरत्र सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत. या परवानगीमुळे आता ७ जूनपासून मद्यविक्रीची दुकाने सुरु होणार असून ३० जूनपर्यंत सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत वाईन शॉपसह, परमीट रूम, बार येथेही सीलबंद बाटलीमध्ये मद्य विक्री करता येणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून लॉकडाऊन असल्याने जिल्ह्यात मद्यविक्री बंद करण्यात आली होती. गेल्या महिन्यात शासनाने १७ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले होते तरी मद्यविक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी अगोदर ग्रीन व आॅरेंज झोनमध्येच मद्यविक्रीला परवानगी दिली व नंतर शासनाने या निर्णयात बदल करून सर्व ठिकाणी मद्यविक्रीस प्रतिबंधित क्षेत्र वगळता परवानगी दिली होती. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातही एक दिवसानंतर परवानगी मिळाली. मात्र त्यानंतर काहीच दिवसात मद्य विक्री बंद करण्यात आली.अखेर मनपा क्षेत्रातही परवानगीलॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शिथिलता देत रेड झोन (मनपा क्षेत्र) व प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतरत्र मद्यविक्रीस परवानगी देण्यात आली. त्यानंतर अनलॉक-१मध्ये ५ जून रोजी इतर व्यवहारांसह मनपा क्षेत्रातही मद्य विक्री सुरू होण्याची अपेक्षा होती. अखेर मनपा क्षेत्रात प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतरत्र मद्य विक्री दुकाने सुरू करण्याचे आदेश ६ जून रोजी काढण्यात आले.परमिट रुमलाही सीलबंद मद्य विक्रीस परवानगीगेल्या महिन्यात मद्यविक्रीला परवानगी देताना केवळ वाईन शॉप सुरू करण्यात आले. मात्र आता वाईन शॉपसह परमिट रुम, बारदेखील सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असून तेथून सीलबंद मद्य विक्री करता येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परमिट रुम, बारमधूनही सीलबंद मद्य विक्रीची परवानगी मिळण्याची मागणी जिल्हा वाईन डिलर असोसिएशनच्यावतीने करण्यात येत होती.परमिट रुम, बारमधूनही आता सीलबंद मद्य विक्रीची परवानगी मिळाली असून या निर्णयाचे संघटनेच्यावतीने स्वागत करण्यात येत असून सर्वच मद्यविक्रीच्या ठिकाणी नियमांचे पालन केले जाईल, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष ललित पाटील यांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव