जळगाव तालुका सेफ झोनमध्ये कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST2021-07-21T04:13:16+5:302021-07-21T04:13:16+5:30

जळगाव : जिल्हाभरात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून शहरातही मोठा दिलासा मिळाला आहे. जळगाव तालुका हा गेल्या तीन दिवसांपासून ...

Permanent in Jalgaon taluka safe zone | जळगाव तालुका सेफ झोनमध्ये कायम

जळगाव तालुका सेफ झोनमध्ये कायम

जळगाव : जिल्हाभरात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून शहरातही मोठा दिलासा मिळाला आहे. जळगाव तालुका हा गेल्या तीन दिवसांपासून सेफ झोनमध्ये असून सलग तिसऱ्या दिवशी तालुक्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या २ ने कमी होऊन २५ वर आली आहे.

जिल्ह्यात मंगळवारी अमळनेर १, चोपडा २, भुसावळ २, चाळीसगावात ६ रुग्ण आढळून आले आहेत. अन्य ठिकाणी एकही रुग्ण आढळून आलेला नाही. कोरोनाचे मृत्यू थांबल्याचा मोठा दिलासा जिल्ह्याला मिळाला आहे. दरम्यान, मंगळवारी अतिदक्षता विभागात दाखल रुग्णांची संख्या वाढून ८ वर गेली आहे. जिल्ह्यात एकूण ११४ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी चाळीसगावात सर्वाधिक ४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी आरटीपीसीआरचे १६०० अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३ बाधित आढळून आले तर ॲन्टीजनच्या १६६० तपासण्या झाल्या यात ९ बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Permanent in Jalgaon taluka safe zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.