शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
2
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
3
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
4
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
5
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
6
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
7
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
8
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
9
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
10
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
11
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
12
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
13
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
14
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
15
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
16
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
17
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
18
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
19
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
20
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक

मोदींच्या आताच्या कार्यकाळात जनता जास्त भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 15:48 IST

चुडामण बोरसे । जळगाव : मोदी सरकारच्या पहिल्या पाच वर्षापेक्षाही आताच्या कार्यकाळात जनता जास्त भयभीत झाली आहे. केंद्राने आणलेला ...

चुडामण बोरसे ।जळगाव : मोदी सरकारच्या पहिल्या पाच वर्षापेक्षाही आताच्या कार्यकाळात जनता जास्त भयभीत झाली आहे. केंद्राने आणलेला नागरिकत्व संशोधन कायदा म्हणजे जनतेला त्रास देण्याचे मोठे षडयंत्र आहे, असा आरोप भारतीय नागरी हक्क कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केला.नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी त्या जळगावात आल्या होत्या. त्यांच्याशी झालेला हा संवादप्रश्न- कायद्याला प्रचंड विरोध असूनही सरकार ऐकायला तयार नाही?उत्तर- मूळात सीएए हा कायदा आणि एनआरसी आणि एनपीए ही विधेयके संविधान आणि राष्टÑवादाच्या विरोधात आहेत. यात दुरुस्ती करावी आणि यात शेजारील राष्टÑांनाही समावेश करुन घेण्यात यावे, अशी मागणी आहे. सरकारलाही एक दिवस जाग येईल, याची खात्री आहे.प्रश्न- सरकारविरुद्धच्या लढाईत आपल्यासोबत कोण आहेत?उत्तर - सीएए, एनआरसी आणि एनपीएमध्ये सुधारणा करण्यात यावी, याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. देशात काय सुरु आहे. हे मी सांगण्याची गरज नाही, उद्योगपती राहूल बजाज यांनीच सर्व काही सांगून टाकले आहे. सरकारविरुद्धची ही लढाई आम्ही नाही तर युवकच लढत आहेत. ही विचारांची लढाई आहे. त्यांच्या मागे आम्ही उभे आहोत आणि राहू. विरोधकांनीही एकत्र यावे, अन्यथा विरोधकांंवरील जनतेचा विश्वास उडेल.प्रश्न- गुजरातमधील दंगलीनंतर पीडीतांना मदत केली तरीही आपल्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप झाले?उत्तर - गुजरात दंगलीनंतर आम्ही अनेक गरजूंना मदत केली. यातून काही तक्रारी झाल्या. याप्रकरणी चौकशी सुरु आहे. आमची बाजू सत्याची आहे. सत्य कधीही लपून राहत नाही, याची खात्री आहे. आणि चांगले काम करण्याचे चांगले परिणाम होतात, यावर माझा विश्वास आहे.सीएएतून सरकारला काय साध्य करायचे आहे?नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या पाच वर्षातील कार्यकाळापेक्षाही दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच लोक अधिक घाबरले आहेत. या सरकारला कामगार, शेतकरी, ओबीसी, अल्पसंख्यांक, दलित ही रेषेच पुसून टाकायची आहे. देशापुढे अनेक प्रश्न आहेत. त्याकडे डोळझाक करुन अन्य प्रश्न पुढे केले जात आहेत. हा कायदा आणणे म्हणजे त्याचाच एक भाग आहे.७०० स्वयंसेवक आसाममध्येकेंद्राने आणलेल्या कायदा आणि विधेयकांना विरोध करण्यासाठी आसाममध्ये फाऊंडेशनचे ७०० स्वयंसेवक कार्यरत आहेत. फाऊंडेशनच्यावतीने आदिवासी क्षेत्रातील वनजमीनी आणि त्यासंबंधीचे कायदे यावर जनजागृती केली जात असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी संविधान बचाव नागरी कृती समितीचे मुकुंद सपकाळे, प्रा. प्रितीलाल पवार, दिलीप सपकाळे उपस्थित होते.

टॅग्स :interviewमुलाखतJalgaonजळगाव