कॅरीबॅग वापरल्यास दंडात्मक कार्यवाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 00:00 IST2019-09-22T00:00:06+5:302019-09-22T00:00:11+5:30
भडगाव : येथील नगरपरिषदेच्या सभागृहात २१ रोजी प्लॅस्टीक बंदिबाबत शहरातील व्यापा-यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी कॅरीबॅग न वापरण्याबाबतच्या ...

कॅरीबॅग वापरल्यास दंडात्मक कार्यवाही
भडगाव : येथील नगरपरिषदेच्या सभागृहात २१ रोजी प्लॅस्टीक बंदिबाबत शहरातील व्यापा-यांची बैठक आयोजित केली होती.
यावेळी कॅरीबॅग न वापरण्याबाबतच्या सुचना मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी व्यापा-यांना दिल्या. तर बंदी असलेले प्लॅस्टीक वापराताना कोणी आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला.
२१ रोजी दुपारी १२ वाजता पालिकेच्या सभागृहात या बैठकीचे आयोजन केले होते. त्यात मुख्याधिकारी नवाळे म्हणाले की, नागरिकांनी कापडी पिशव्यांचा वापर करावा. पालिकेच्या वतीने प्लॅस्टीक कॅरीबॅग तपासण्यासाठी पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे पथकाला कोणी बंदी असलेले प्लॅस्टीक वापरताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचे संकेत त्यांनी दिले. कापडी पिशव्यांचा वापर करून मोहीमेला हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.