उरूसनिमित्ताने कजगाव येथे पीरबाबांची चादर मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:17 IST2021-09-11T04:17:39+5:302021-09-11T04:17:39+5:30

कजगाव (ता. भडगाव) : येथे अनेक वर्षांची परंपरा राखत उरूसनिमित्ताने यावर्षीही नेहमीप्रमाणे माजी पोलीस पाटील कै. वसंत पाटील ...

Peer Baba's Chadar procession at Kajgaon on the occasion of Urus | उरूसनिमित्ताने कजगाव येथे पीरबाबांची चादर मिरवणूक

उरूसनिमित्ताने कजगाव येथे पीरबाबांची चादर मिरवणूक

कजगाव (ता. भडगाव) : येथे अनेक वर्षांची परंपरा राखत उरूसनिमित्ताने यावर्षीही नेहमीप्रमाणे माजी पोलीस पाटील कै. वसंत पाटील यांच्या घरातून पहिली चादर मिरवणूक काढण्यात आली.

दरवर्षी बैलपोळाच्या उरूसनिमित्ताने जुनेगावातील माजी पोलीस पाटील यांच्या घरातून पीरबांबाच्या चादरला पहिला मान दिला जातो, यंदाही कोविड नियमांचे पालन करून उत्साहात चादर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी राजेंद्र पाटील, रहेमान शाह, राहुल राजपूत, विशाल राजपूत, धनराज महाजन, जगदीश खांडेकर, गणेश पवार, राजेंद्र राजपूत, शंकर महाजन, नारायण राजपूत, प्रशांत पवार, विजय पाटील, नाना महाजन, हर्षल पाटील, शुभम साठे व असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो कॅप्शन

दर्ग्यावर चादर चढविताना राजेंद्र पाटील व ग्रामस्थ.

---

११/८

Web Title: Peer Baba's Chadar procession at Kajgaon on the occasion of Urus