भडगाव पोलीस ठाण्याला शांतता कमिटीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:13 IST2021-07-20T04:13:04+5:302021-07-20T04:13:04+5:30
पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी दि. १८ रोजी हिंदू मुस्लिम बांधवांची बैठक घेऊन सीआरपीसी कलम क्रिमिनल प्रोसिजर ...

भडगाव पोलीस ठाण्याला शांतता कमिटीची बैठक
पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी दि. १८ रोजी हिंदू मुस्लिम बांधवांची बैठक घेऊन सीआरपीसी कलम क्रिमिनल प्रोसिजर कोड सन १९७३चे कलम १४९प्रमाणे प्राप्त अधिकाराअन्वये बकरी ईद व गुरुपौर्णिमा हिंदू व मुस्लिम धर्माचे मंदिर व मज्जिदमधील जबाबदार व्यक्ती इम्रान आली शहादत अली सय्यद आसिम बॅक फाकिंग बेग मिर्झा सोनू मुनाफ खाटीक अल्ताफ भाजी इसाक मलिक पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी नोटीसद्वारे सूचित केले आहे की, दि. २१ रोजी दरम्यान मुस्लिम बांधवांना बकरी ईद व आषाढी एकादशी, तसेच गुरुपौर्णिमा हा सण २३ रोजी साजरा केला जाणार आहे, त्या अनुषंगाने योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
शासनाचे अटी, शर्तीप्रमाणे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र इंदूल हज्जा व आषाढी एकादशी, तसेच गुरुपौर्णिमा या महिन्यात हिंदू मुस्लिम व इतर बांधव यांनी नेहमीच नमाज पठण व पूजा, आरती, नमाज पठणाकरिता मस्जिद व मंदिरात, तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये. बकरी ईद व आषादी एकादशी तसेच गुरुपौर्णिमा निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकत्रित येऊ नये, याबाबत नागरिकांना सूचना देण्यात आल्या.
सध्या कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व कार्यक्रमांना बंदी लागू करण्यात आलेल्या शासनाचे निर्देशानुसार आणि त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांनुसार इतर निर्बंध कायम राहतील. बकरी ईद व आषाढी गुरुपौर्णिमेनिमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही. नागरिकांनी शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी वजा आरती करावी, असे जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास हिंदू मुस्लिम बांधवांवर प्रचलित कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद सर्वांनी घ्यावी, असे बैठकीत पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी नोटीस देऊन कायदेशीररीत्या सूचित करण्यात आले आहे. या बैठकीत हिंदू-मुस्लिम बांधवांनी शासनाच्या नियमांचे पालन करून हिंदू-मुस्लिम सण साजरे केले जातील, असे आश्वासन पोलीस प्रशासनास दिले आहे.