शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
2
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
3
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
4
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
5
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
6
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
7
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
8
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
9
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
10
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
11
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
12
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
13
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
14
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे
15
VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू
18
"याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं"; अंजली कृष्णा यांना अडवणाऱ्याचा सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ
19
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
20
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता

पावणे तीन लाखाचा गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 11:55 IST

एक जण ताब्यात

ठळक मुद्देएलसीबीची कारवाई 

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी दुपारी पावणे दोन वाजता शिवाजी नगरातील केजीएन पार्कमध्ये २ लाख ७८ हजार रुपये किमतीचा गुटखा पकडला. शाहरुख शेख ताज मोहम्मद (२३) याला ताब्यात घेण्यात आले. कारवाईनंतर गुटख्याचा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात देण्यात आला.शिवाजी नगरात एका राहत्या घरात गुटख्याचा साठा असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम यांनी सहायक निरीक्षक रवींद्र बागुल, हेकॉ. चंद्रकांत पाटील, रवींद्र गिरासे, दिनेश बडगुजर, साहेबराव चौधरी, दादाभाऊ पाटील, वाहेदा तडवी, गायत्री सोनवणे, विजयकुमार देसले व रवींद्र घुगे यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी शाहरुख याच्या घरात छापा मारला असता तब्बल २ लाख ७८ हजार रुपये किमत असलेला गुटख्याचा साठा आढळून आला. घटनास्थळाचा पंचनामा करुन शाहरुख याला ताब्यात घेण्यात आले.अन्न व प्रशासन विभागाचे पितळ उघडेगुटख्यावर कारवाई करण्याची मुख्य जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची आहे, मात्र या विभागाकडून कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. इतकेच पोलिसांनी पकडून दिलेल्या साठ्यानंतरही पोलिसात किंवा न्यायालयात केसेस दाखल केलेल्या नाहीत. पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईमुळे अन्न व औषध प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी