पाउले चालती पंढरीची वाट...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 20:18 IST2019-06-18T20:16:07+5:302019-06-18T20:18:20+5:30
दिंडी रवाना : ३२ वर्षांची परंपरा

पाउले चालती पंढरीची वाट...
अमळनेर : संत सखाराम महाराजांच्या जयघोषात, मुखी पंढरीनाथाचे नामस्मरण करीत, हाती भगवा ध्वज घेऊन वाडी संस्थानची पायी दिंडी पंढरपूरला १८ रोजी दुपारी १२ वाजता रवाना झाली. प्रसाद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पैलाड येथील तुळशीबागेतून निघालेली दिंडी २२ दिवसांच्या प्रवासानंतर १० जुलैला पंढरपुरात दाखल होईल.
या दिंडीचे हे अखंडित ३२वे वर्ष आहे. प्रसाद महाराज यांनी अंबर्षी महाराजांचे दर्शन घेऊन पैलाड येथील तुळशीबागेत शेकडो भाविकांना खडीसाखरेचा प्रसाद दिला. यावेळी महिलांनी डोक्यावर तुळस घेऊन हरिनामात मुग्घ होऊन टाळ-मृदंगाच्या गजरात पावलीचा ठेका धरला होता. दुपारी १२ ला प्रसाद महाराजांसमवेत सुमारे २०० हून अधिक वारकरी दिंडीत सामिल झाले.
दिंडीचा पहिला मुक्काम पारोळा येथे आहे. तेथून आडगाव, भडगाव, नगरदेवळा, नेरी, नागद, बिलखेडा, नागापूर, पिशोर, चिखलठाण, टाकळी, दौलताबाद, वाळूज, पैठण, शेवगाव, पाथर्डी, धामणगाव, कडा, आष्टी, अरणगाव, जवळा, करमाळा, निंभोरा, वडशिवणे, सापटणे, करकंब मार्गे १० जुलैला पंढरपूर येथे पोहोचेल.