शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहारातील ठेकेदाराला राजाश्रय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 12:26 IST

एकनाथराव खडसे : अधिवेशनात सरकारला जाब विचारणार

जळगाव : लहान मुलांच्या तोंडाचा घास हिसकावणाऱ्या ठेकेदारावर चौकशी होऊनी कारवाई होत नसल्याने ही आश्चर्याची बाब असल्याचे सांगत या ठेकेदाराला पॉवरफूल राजाश्रय असल्याचा आरोप माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी केला आहे. या राजाश्रयाचा आपणही शोध घेत असून या घोटाळ्यासंदर्भात आपण अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.रविवारी दुपारी खडसे यांची पत्रकारांनी भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये वाटप होणाºया शालेय पोषण आहारात धान्यादी माल न घेता देयके अदा करण्याचा प्रकार चौकशीतून समोर आला आहे़ या घोटाळ्यावर जि.प. सर्वसाधारण सभेतही सदस्यांनी कारवाईची मागणी केली होती.दरम्यान, या प्रकरणात ठेकेदाराला नोटीस बजावून त्याच्याकडून या प्रकरणातील एक लाख ६७ हजारांची रक्कम वसूल करण्यात आली आहे़ हा गैरव्यवहार दडपण्यासाठी कुणीतरी मजबूत व्यक्ती ठेकेदाराच्या पाठिशी असल्याचा संशय खडसे यांनी व्यक्त केला़ अधिवेशनात प्रश्न मांडून सरकारला जाब विचारणार असल्याचे ते म्हणाले.बीएचआरची चौकशी थंड बस्त्यात४कोट्यावधी रूपयांच्या गैरव्यवहारामुळे बीएचआर पतसंस्थेचे ठेवीदार आजही हवालदील असताना अवसायक जितेंद्र कंडारे यांची बदली करावी असे पत्र केंद्र सरकारने दिलेले असूनही राज्य सरकार बदली का करीत नाही, या पतसंस्थेची आर्थिक विभागामार्फत चौकशी करण्याचेही केंद्र सरकारने आदेश दिले आहे. या आदेशाचे देखिल राज्य सरकारने पालन केले नाही, याचाही जाब विचारणार असल्याचे ते म्हणाले.विरोधकांमध्ये ईच्छाशक्तीच नाहीविरोधकांकडे आता ईच्छाशक्तीच राहिली नाही, असे सांगत राज्यात पुन्हा भाजपाची सत्ता येईल, असा दावा एकनाथराव खडसे यांनी केला आहे़ लोकसभा निवडणूक निकालाने विरोधक नर्व्हस ब्रेक डाऊन झाले आहे़ प्रश्न जैसे थे होते. तरीदेखील मतदारांनी भाजपाला कौल दिला़ विधानसभेतील जनता भाजपाला मतदान करेल असे खडसे यावेळी म्हणाले़ मुख्यमंत्री पदावरून भाजप-सेनेत काय ठरलय कस ठरलय हे जोपर्यंत उघड होत नाही, तो पर्यंत चर्चा होणारच जागा वाटपांपर्यंत दावे होतीलच असेही ते म्हणाले़ मात्र राज्यात मुख्यमंत्री भाजपाचा होईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव