नैसर्गिक उपचार पद्धतीने रुग्णांनी केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST2021-06-02T04:14:27+5:302021-06-02T04:14:27+5:30

पाचोरा येथील पुनमचंद लाहोटी (७५) यांचा सीटीस्कॅन स्कोअर १५/२५ होता, तर किडणीच्या विकारामुळे क्रियाटीनीन ६.९० झाले होते. ऑक्सिजन पातळी ...

Patients overcome corona with natural treatment | नैसर्गिक उपचार पद्धतीने रुग्णांनी केली कोरोनावर मात

नैसर्गिक उपचार पद्धतीने रुग्णांनी केली कोरोनावर मात

पाचोरा येथील पुनमचंद लाहोटी (७५) यांचा सीटीस्कॅन स्कोअर १५/२५ होता, तर किडणीच्या विकारामुळे क्रियाटीनीन ६.९० झाले होते. ऑक्सिजन पातळी ८६ टक्केवर आली होती. अशा स्थितीत त्यांच्यावर उपचार करणे डाॅक्टरांपुढे मोठे आव्हान होते. या रुग्णांसाठी कोरोना बरे करण्यासाठी आवश्यक इंजेक्शन्स वा औषधी दिले तर धोक्याचे ठरू शकले असते. पण डॉ. पाटील दाम्पत्याने रुग्णांच्या सहमतीने प्रचलित नैसर्गिक पध्दतीने उपचार करण्याचा निर्णय घेतला. त्यांना वजनानुसार नारळ पाणी, मोसंबी ज्यूस, विविध फळांचे रस, प्राणायाम, प्रोन व्हेंटिलेशन, फॅनद्वारे व्हेंटिलेशन, सकारात्मक समुपदेशन यामुळे ते कोणतेही औषध वा इंजेक्शन न घेता बरे झाले. विशेष म्हणजे त्यांचा किडनीचा विकारही यामुळे बरा झाल्याचे पुनमचंद लोहाटी यांनी सांगितले.

बालदमा असूनही कोरोनातून वाचला जीव —

नगरदेवळा (ता. पाचोरा) येथील लता देविदास पाटील (६५) यांना लहानपणापासून दम्याचा विकार जडला होता, तर सतत स्टेरॅाइड्स घेतल्याने शरीर स्थूल झालेले. अशात त्यांना डबल न्युमोनिया झाला. त्यांचा सीटीस्कॅन स्कोअर १५/२५ होता. ऑक्सिजन लेव्हल ८४ टक्के इतकी होती. या रुग्णासदेखील त्यांच्या बाह्य आजारामुळे इतर इंजेक्शन देणे जिकरीचे होते. मात्र, कोविड सेंटरच्या डाॅक्टरांनी नैसर्गिक उपचारांच्या सहाय्याने विविध फळांचा रस, काढे व ओली हळद आहारात दिले. त्यामुळे दमा असूनही त्या कोरोनातून मुक्त झाल्या.

कोरोना बरा झालाच पण वाचा ही परतली —

गुढे (ता. भडगाव) येथील रवींद्र मोरे (५०) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने तातडीने ॲन्जिओप्लास्टी करावी लागली होती. त्यात त्यांना डबल न्युमोनियाने ग्रासले. मेंदूतील गाठीच्या संभाव्य धोक्याने त्यांची वाचाही गेली. सीटीस्कॅनचा स्कोअर १८/२५ होता. त्यामुळे त्यांचे कुटुंब हवालदिल झालेच, शिवाय त्यांच्यावर न्युमोनियाचा की, मेंदूचा उपचार करायचा असा प्रश्न निर्माण झाला. अशा गंभीर परिस्थितीत हरियाणा येथील डाॅ. विश्वरूप चौधरी यांच्या मार्गदर्शनाने नैसर्गिक पध्दतीच्या उपचारांचा अवलंब करण्यात आला. ते कोरोनातून मुक्त झाले अन् त्याच बरोबर त्यांची वाचाही शंभर टक्के परतली. या तिन्ही रुग्णांवर डाॅ. नीलेश पाटील, डाॅ. पल्लवी पाटील, डाॅ. गोविंदा पवार, नर्सिंग स्टाॅफचे शुभम पाटील, संदीप पाटील, प्रवीण पाटील, सागर माळी, राजू मोरे, बाळासाहेब मांडोळे यांनी मेहनत घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डाॅ. प्रफुल्ल पाटील, रवींद्र पाटील व शाम मुसंडे यांनी समुपदेशन केले.

Web Title: Patients overcome corona with natural treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.