जळगाव, अमळनेर, भुसावळात रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:36 IST2021-09-02T04:36:10+5:302021-09-02T04:36:10+5:30
जळगाव : मंगळवारी जिल्ह्यात ३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. जळगाव, अमळनेर आणि भुसावळ या ठिकाणी प्रत्येकी १ ...

जळगाव, अमळनेर, भुसावळात रुग्ण
जळगाव : मंगळवारी जिल्ह्यात ३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. जळगाव, अमळनेर आणि भुसावळ या ठिकाणी प्रत्येकी १ रुग्ण समोर आला आहे. तर ४ रुग्ण बरे झाल्याने सक्रिय रुग्णांची संख्या घटून २१ वर आली आहे. सर्व रुग्ण हे ॲन्टिजन चाचणीत समोर आले आहेत.
मंगळवारी आरटीपीसीआरचे ९६४ अहवाल प्राप्त झाले त्यात एकही रुग्ण आढळून आलेला नसल्याने मंगळवारी पॉझिटिव्हिटी शून्यावर आली आहे. तर ॲन्टिजनच्या १,७५४ अहवालांमध्ये ३ बाधित आढळून आले आहेत. जळगाव शहरात १ बाधित रुग्ण समोर आला असून ३ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ४ वर पोहोचली आहे.
बोदवड पुन्हा शून्यावर
मध्यंतरी अचानक रुग्ण वाढ झालेल्या बोदवड तालुक्यात सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा शून्यावर आली आहे. सर्वात आधी शून्यावर आलेल्या बोदवड तालुक्यात ऑगस्टच्या मध्यंतरी रुग्णसंख्या १५ वर पोहोचली होती. मंगळवारी यातील एकमेव रुग्णही बरा झाल्याने आता या तालुक्यात एकही रुग्ण नाही.
८८ हजार लसींचा पुरवठा
जळगाव : जिल्ह्याला मंगळवारी ८८ हजार लसींचा पुरवठा झाला असून हा गेल्या ८ महिन्यातील सर्वाधिक पुरवठा आहे. यात ८० हजार कोविशिल्ड लसींचे डोस असून ८ हजार ३० डोस हे कोव्हॅक्सिनचे आहेत. जळगाव महापालिकेला ३ हजार कोविशिल्ड तर ५०० कोव्हॅक्सिनचे डोस देण्यात आले आहेत. रेडक्रॉस सोसायटीच्या केंद्रावर ५०० कोविशिल्डचे डोस देण्यात आले आहेत.