एअर ॲम्ब्युलन्सने हैदराबादला नेलेल्या रुग्णास मदतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST2021-06-02T04:14:06+5:302021-06-02T04:14:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगावाहून एअर ॲम्ब्युलन्सने हैदराबादच्या किम्स हॉस्पिटलला नेलेल्या नयना विनोद पाटील यांना फुप्फुस प्रत्यारोपण करावे ...

The patient who was taken to Hyderabad by air ambulance needs help | एअर ॲम्ब्युलन्सने हैदराबादला नेलेल्या रुग्णास मदतीची गरज

एअर ॲम्ब्युलन्सने हैदराबादला नेलेल्या रुग्णास मदतीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगावाहून एअर ॲम्ब्युलन्सने हैदराबादच्या किम्स हॉस्पिटलला नेलेल्या नयना विनोद पाटील यांना फुप्फुस प्रत्यारोपण करावे लागणार आहे. त्यासाठी लागणारा खर्च नयना यांच्या परिवाराच्या अवाक्याच्या बाहेर आहे, त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या परिवाराने मदतीचे आवाहन केले आहे.

नयना विनोद पाटील यांना एकमो मशिन लावून जळगावाहून हैदराबादला हलवण्यात आले आहे. त्यांच्यावर तेथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनानंतर फुप्फुसात संसर्ग वाढल्याने त्यांना आधी जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आतापर्यंत नयना यांच्या परिवाराने त्यांच्या उपचारासाठी ९० लाखांपेक्षा जास्त खर्च केला आहे. तसेच फुप्फुस प्रत्यारोपणासाठी ६० ते ६५ लाखांपर्यंत खर्च लागणार आहे आणि नंतरच्या उपचारांसाठी ४० लाख रुपये लागणार आहेत.

कोट -

परिवाराकडे असलेला पैसा आम्ही वापरला आहे. आता फुप्फुस प्रत्यारोपणाची गरज आहे. त्यामुळे आम्ही सर्वांना मदतीचे आवाहन करत आहोत.

- सिद्धार्थ पवार, रुग्णाचा भाऊ.

Web Title: The patient who was taken to Hyderabad by air ambulance needs help