लस घेण्याआधीच रुग्णाला आली चक्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:21 IST2021-09-05T04:21:38+5:302021-09-05T04:21:38+5:30
जळगाव : लस घेण्याआधीच रोटरी भवन येथील लसीकरण केंद्रावर रुग्णाला चक्कर आली. त्यानंतर त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात ...

लस घेण्याआधीच रुग्णाला आली चक्कर
जळगाव : लस घेण्याआधीच रोटरी भवन येथील लसीकरण केंद्रावर रुग्णाला चक्कर आली. त्यानंतर त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या मेंदूत रक्तस्राव होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
काशिनाथ सोनार (वय ७५) रा. समतानगर हे रोटरी भवन येथे कोविशिल्ड या लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी गेले होते. त्यांनी नोंदणी केली. मात्र लस घेण्यासाठी जात असतानाच त्यांना चक्कर आली. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांना कळवण्यात आले आणि खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्या मेंदूत रक्तस्राव होत असल्याचे समोर आले. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सांगितले की, संबंधित व्यक्तीने लसीसाठी नोंदणी केली होती. मात्र लस घेण्यापूर्वीच त्यांना चक्कर आली. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. तर सोनार यांचा मुलगा जितेंद्र याने याबाबत लस घेतल्यानंतर त्यांना भोवळ आली असल्याची तक्रार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे.