परवेज शेखची कारागृहात रवानगी
By Admin | Updated: July 9, 2017 01:18 IST2017-07-09T01:18:19+5:302017-07-09T01:18:19+5:30
बलात्कार प्रकरण : पित्याचा अटकपूर्व मंजूर

परवेज शेखची कारागृहात रवानगी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून २४ वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाºया परवेज शेख रईस शेख याची न्यायालयाने शनिवारी न्यायालयीन कोठडी सुनावली, त्यानंतर त्याची कारागृहात रवानगी केली.
फौजदार पिता रईस अब्दुल शेख याचा अटकपूर्व जामीन अर्ज खंडपीठाने मंजूर केला आहे. बचाव पक्षाच्या वकिलांनीच न्यायालयात ही माहिती दिली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी परवेजला न्या.एन.के.पाटील यांच्या न्यायालयात हजर केले होते.
परवेज शेख याने शहरातील एका २४ वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून सतत पाच वर्ष बलात्कार केला तर त्याचा फौजदार पिता रईस शेख याने पीडित तरुणीला धमकी दिल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला पिता-पुत्राविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हा सत्र न्यायालयाने दोघांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर परवेज शेख याला अटक करण्यात आली होती.