आयटी फेस्ट स्पर्धेत राज्यभरातून विद्यार्थांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:29 IST2021-03-04T04:29:32+5:302021-03-04T04:29:32+5:30
जळगाव - केसीई सोसायटी संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट ॲण्ड रिसर्च येथे आयटी फेस्टा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ...

आयटी फेस्ट स्पर्धेत राज्यभरातून विद्यार्थांचा सहभाग
जळगाव - केसीई सोसायटी संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट ॲण्ड रिसर्च येथे आयटी फेस्टा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यभरातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सहभाग नोंदवून सादरीकरण केले.
२६ व २७ फेब्रुवारी राेजी ही स्पर्धा ऑनलाइन पार पडली. पहिल्या दिवशी पोस्टर प्रेझेंटेशन, सी आणि सी प्लस प्लस प्रोग्रामिंग कॉन्टेस्ट तसेच दुसऱ्या दिवशी टेकझिऑन अंतर्गत सॉफ्टवेअर एक्झिबिशन ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले. एकूण ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यात आपला सहभाग नोंदविला. पुणे, वडाळा पूर्व, चिपळूण, खामगाव, भुसावळ, चोपडा आणि जळगाव येथील विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश होता. पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत तृप्ती सतीश खरे, भूपेंद्र विकास राणे, प्रणव तरल, ऋतुजा ब्रीदवाडकर आदींनी यश मिळविले.