अर्धवट कापलेला खांब अखेर काढला

By Admin | Updated: November 19, 2014 13:52 IST2014-11-19T13:51:56+5:302014-11-19T13:52:07+5:30

शहरातील गांधी पुतळ्याजवळ वाहनधारकांना अडचणीचा ठरणारा अर्धवट कापण्यात आलेला विद्युत खांब अखेर पूर्णपणे कापण्यात आला आहे. यामुळे वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे

The partially cut columns were finally removed | अर्धवट कापलेला खांब अखेर काढला

अर्धवट कापलेला खांब अखेर काढला

नंदुरबार : शहरातील गांधी पुतळ्याजवळ वाहनधारकांना अडचणीचा ठरणारा अर्धवट कापण्यात आलेला विद्युत खांब अखेर पूर्णपणे कापण्यात आला आहे. यामुळे वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे. 
शहरातील हाट दरवाजाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ राज्य वीज वितरण कंपनीचा खांब होता. हा खांब मोठय़ा वाहनांच्या धडकेने वाकला होता. वाकलेला हाच खांब येणार्‍या-जाणार्‍या वाहनांना अडचणीचा ठरत होता. याबाबत परिसरातील रहिवासी तसेच वाहनधारकांनी संबंधित यंत्रणेकडे तक्रार केली. यानंतर संबंधितांनी तो खांब कापला. परंतु हा खांब कापताना जमिनीपासून अर्धा फूट भाग तसाच ठेवण्यात आला. यामुळे हाच अर्धवट कापलेला खांब पूर्वीपेक्षाही त्रासदायक ठरू लागला. या अर्धवट कापलेल्या खांबाला वाहनांच्या टायरचा स्पर्श झाल्याने टायर फाटण्याचे प्रकार घडले. तसेच काही वाहने पंर झाली. यात मोटारसायकलस्वारांचे प्रमाण सर्वाधिक होते. 
याबाबतचे वृत्त 'लोकमत'ने प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल घेत संबंधित यंत्रणेने पुतळ्यालगतचा अर्धवट कापलेला खांब पूर्णपणे जमिनीच्या समांतर पातळीपर्यंत कापला

Web Title: The partially cut columns were finally removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.