पारोळा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला विविध विभागाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:23 IST2021-09-10T04:23:32+5:302021-09-10T04:23:32+5:30
पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या दालनात दुपारी १.१५ वाजता ही आढावा बैठक घेण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज ...

पारोळा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला विविध विभागाचा आढावा
पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या दालनात दुपारी १.१५ वाजता ही आढावा बैठक घेण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पहिल्यांदा पारोळा पंचायत समितीला भेट दिल्याने त्यांचे स्वागत गटविकास अधिकारी विजय लोंढे यांनी केले. त्यांनी विभागनिहाय अधिकारीवर्गाला बोलावून मग सर्वच विभागांचा विकासकामाचा आढावा या वेळी घेण्यात आला. सुरू असलेल्या योजनांची स्थितीही या वेळी डॉ. पंकज आशिया यांनी जाणून घेतली.
अनेक योजना या संथगतीने सुरू आहेत. काही योजना मध्येच थांबल्यात तर काहींना सुरुवात झाली नाही. त्याबाबत काय अडचणी येत आहे, त्याचीही कारणे या बैठकीत त्यांनी जाणून घेत त्यावर मार्गदर्शन त्यांनी केले.
या वेळी सिंचन, जलसंधारण, कृषि, ग्रामीण पाणीपुरवठा, बालविकास एकात्मिक योजना, घरकुल, रोजगार हमी योजना, शिक्षण, ग्रामपंचायत, मृद जलसंधारण, इंदिरा विकास आवास योजना, नरेगा, आरोग्य, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत योजना आदी विभागांचा आढावा या वेळी घेण्यात आला.
मुदतीच्या आत सर्व योजना पूर्ण करण्याबाबत कडक सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी या वेळी उपस्थित सर्व अधिकारी व विभागप्रमुखांना दिल्यात.
या वेळी गटविकास अधिकारी विजय लोंढे, गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे, बालविकास प्रकल्प अधिकारी बी. व्ही. वारुळकर,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रांजली पाटील, मृद जलसंधारण अभियंता शीतल वाघ, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एस. सूर्यवंशी, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता एल. पी. हिरे, अभियंता धीरज पाटील, शालेय पोषण आहार योजनेचे अधीक्षक चंद्रकांत चौधरी आदी जण उपस्थित होते.