पारोळ्यात ८३ रक्तदात्यांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:12 IST2021-06-24T04:12:28+5:302021-06-24T04:12:28+5:30

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्थेचे संचालक रोहन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, ...

In Parola, 83 blood donors donated blood | पारोळ्यात ८३ रक्तदात्यांनी केले रक्तदान

पारोळ्यात ८३ रक्तदात्यांनी केले रक्तदान

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्थेचे संचालक रोहन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पराग मोरे, डॉ. राहुल कुंवर, दीपक पाटील, छोटू पाटील, संजय मोरे, सहजीवन पतपेढीचे अध्यक्ष प्रसाद वसंतराव पाटील, अजय पाटील, सचिन पाटील, राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. पाटील, चोरवड शाळेचे मुख्याध्यापक विनोद माने आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ८३ रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले. यावेळी सर्व रक्तदात्यांचा नगरसेवक रोहन मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांना रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

नवजीवन रक्तपेढी धुळे यांनी हे रक्त संकलित केले.

छाया--

पारोळा येथे रक्तदान शिबिरप्रसंगी उपस्थितीत मान्यवर.

Web Title: In Parola, 83 blood donors donated blood