आई-वडील घराबाहेर गेले अन् मुलाने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:16 IST2021-04-09T04:16:12+5:302021-04-09T04:16:12+5:30
फोटो लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गुरूनानक नगरात रितीक प्रेम पवार (वय ३०) या तरूणाने राहत्या घरात गळफास ...

आई-वडील घराबाहेर गेले अन् मुलाने केली आत्महत्या
फोटो
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गुरूनानक नगरात रितीक प्रेम पवार (वय ३०) या तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रितीक प्रेम पवार हा आपल्या आई-वडील व बहिणीसोबत राहात होता. बुधवारी आई आरती आणि वडील प्रेम दुलीचंद पवार हे कामानिमित्त बाहेर गेले होते. सायंकाळी ४.३०च्या सुमारास रितीकने राहत्या घरातील मागच्या खोलीत दोरीने गळफास घेतला. हा प्रकार घरातील सदस्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी हंबरडा फोडला. त्यांनी तातडीने रितीकला जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले. या तरूणाने गळफास घेतल्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रितीकच्या पश्चात आई आरती, बहीण निकिता आणि वडील प्रेम पवार असा परिवार आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार रघुनाथ महाजन करत आहेत.