शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पालकांची तक्रार असते- मुलगा मोबाइल सोडतच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 16:07 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘सुजाण पालकत्व’ या सदरात मानसोचार तज्ज्ञ डॉ.नीरज देव यांचा लेख ‘मुलगा मोबाइलच सोडत नाही’

हा प्रश्न सोडविण्यासाठी या समस्येला नीट समजावून घेणे गरजेचे आहे. आज मोबाइल बहुउपयोगी उपकरण म्हणून वापरल्या जातोय ही वस्तुस्थिती आपण मान्य करायला हवी. तो केवळ दूरभाष म्हणून वापरला जात नाही तर कॅमेरा, व्हीडिओ, अल्बम, कॅल्युलेटर, कॉम्प्युटर, टीव्ही, रेडीओ, टेपरेकॉर्डर, सीडी-डिव्हीडी प्लेयर, इंटरनेट संपर्क अगदी पुस्तक म्हणूनसुद्धा आदी अनेकानेक कामांसाठी सहजतेने वापरता येणारे, सहज उपलब्ध होणारे व परवडणारे साधन म्हणून वापरला जात आहे. जेव्हा एखादे साधन इतके आकर्षक व बहुउपयोगी बनते तेव्हा त्याचे व्यसन जडणे तसे स्वाभाविकच ठरते. विशेषत: समज येण्यापूर्वीच्या वयात तो हाती लागला तर मग विचारणेच नको. आज काल तर हातात खुळखुळा धरण्याआधी मोबाइल धरला जातो व तो खुळखुळ्याचेही काम करत असल्याने हातातून सुटतच नाही. या समस्येची व्यापकता ध्यानात घेऊन पालकांनी खालील बाबी पाळायला हव्यात।०१। अगदी बालवयात, शिशूवयात मुला वा मुलीने शांत बसावे, त्रास देऊ नये म्हणून पालक त्यांना मोबाइल देताना दिसतात. ते बाळाच्या शारीरिक विकासासोबतच मानसिक व कधी कधी मेंदूजन्य विकासाला घातक ठरते. हे कटाक्षाने टाळावे.०२। शक्यतोवर मोबाइलचा वापर केवळ फोन म्हणूनच करायला हवा. जर ते शक्य नसेल तर घरात संपकार्साठी लॅण्डलाईन फोन शक्यतो वापरावा. मोबाईल बंद ठेवावा. फोटो, व्हीडिओ इत्यादी बाबींसाठी शक्यतोवर कॅमेरा इत्यादीसारखी साधनेच वापरावीत. क्रिकेट मॅच, धारावाहिक, बातम्या इत्यादी पाहण्यासाठी मोबाइलचा वापर टाळावा. शक्यतोवर टीव्ही वा एलसीडीचा वापर करावा. थोडक्यात होता होईल तितका मोबाइलचा वापर कमी करावा.०३। घरात असताना मुलांसोबत प्रत्यक्ष संवादाला अधिक वेळ द्यावा. त्यातही मुलांचे म्हणणे ऐकून घेणे, त्याच्यातील उपजत कलागुणांना वाव देणे, कौतुक करणे इत्यादी बाबी केल्या तर मुलांचे लक्ष मोबाइलवरून कमी करणे शक्य होऊ शकते.०४। मुलांनी उन्हातान्हात क्रिकेट, फुटबॉल इत्यादी खेळ खेळून आजारी पडण्यापेक्षा मोबाइलवर त्यांनी ते खेळ खेळावेत, असा चुकीचा सल्ला काही पालक देत असतात. असा सल्ला टाळून मुलांना मैदानी खेळ खेळायला पालकांनी प्रोत्साहित करायला हवे. त्यामुळे मुलांचा मुलांशी संपर्क वाढतो, त्यांच्या सामाजिक समायोजनाला मदत होते. मैदानी खेळाकडे लक्ष वाढल्याने मोबाइलकडे लक्ष जाण्याची शक्यता कमी व्हायला मदत होते.०५। त्याचप्रमाणे बुद्धिबळ, कॅरम इत्यादी बैठे खेळ प्रत्यक्ष खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. वाटल्यास आरंभी आपण त्यांच्यासोबत खेळून नंतर इतर मुलांसोबत खेळायला उत्तेजन द्यावे. या प्रकारच्या खेळांमुळे बुद्धीच्या विकासासोबत संयम, वाट पहाण्याची तयारी, एकाग्रता आदी बाबींचा विकास मुलांत होतो. प्रत्यक्ष खेळण्याकडे चित्त लागल्याने, त्यातील जयापजयाचे थ्रिल अनुभवल्याने मोबाइलवर लक्ष जाण्याची शक्यता कमी होते.या व अशा काही बाबींचा कौशल्याने केलेला वापर मुलांना मोबाइलपासून परावृत्त करायला उपयोगी ठरु शकतो. मोबाइल, व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक आणि मुलं असे समीकरणच झाले आहे. या समीकरणात आई-वडील आले की व्यस्त समीकरणाला सुरवात होते. अर्थात आई-वडीलच कशाला, नवरा-बायकोचे नातेही याच व्यस्ततेत बसते. मोबाइलचा अति वापर मुलं करतात, ही प्रत्येक पालकासाठी मोठी समस्या बनलेली आहे. यातून सुटका कशी करावी हा त्याहीपेक्षा गहन प्रश्न बनला आहे. यातून काही प्रकारच्या मानसिक समस्या वा मनोविकृती निर्माण होण्याची शक्यता असते. या समस्यांचा विचार करण्यासाठी सायबर सायकॉलॉजीची निर्मिती अलिकडेच करण्यात आलेली आहे.