जामनेरला आंधळ्या प्रेमापुढे पालकही हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:41 IST2019-01-30T00:36:27+5:302019-01-30T00:41:13+5:30
जामनेर , जि.जळगाव : प्रेम आंधळे असते हे अनेकदा सिद्ध झाले असून, जामनेर तालुक्यात घडली. चार दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात ...

जामनेरला आंधळ्या प्रेमापुढे पालकही हतबल
जामनेर, जि.जळगाव : प्रेम आंधळे असते हे अनेकदा सिद्ध झाले असून, जामनेर तालुक्यात घडली. चार दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. मंगळवारी ती तरुणी एका तरुणासोबत मध्य प्रदेशातील बºहाणपूर येथे विवाह करुनच पोलीस ठाण्यात दाखल झाली.
हे तरुण-तरुणी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांची मैत्री वाढली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि प्रेमाने त्यांना थेट विवाह बंधनातच अडकवले. विशेष म्हणजे हे तरुण तरुणी भिन्न जाती धर्माचे असूनही त्यांनी एकमेकांसोबत सात जन्म राहण्याचा आणा भाका घेतल्या.
मुलीकडच्या अन् मुला कडच्या मंडळींनी या प्रेमवीरांना समजावण्याच्या आटोकाट प्रयत्न केला. मुुलीची आई अक्षरश: ढसाढसा रडत रडत पाय धरुन बेटा तू घरी चल, अशी विनंती करीत होती. वडील, भाऊ, बहीण, नातेवाईकांनी हात पाय जोडले. समाजबांधव गोळा झाले. मात्र तरुणी बेधुंद झाली होती. ती ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. अखेर मुलगा-मुलगी सज्ञान असल्याने पोलीस व कुटुंबयदेखील हतबल झाले. अखेर ती तरुणी त्या तरूणाच्या घरी नांदायला गेली.
खरंच प्रेम आंधळं असते?
ज्यांनी त्याला जन्म दिला, लहानाचे मोठे केले ज्याच्या पायाखाली स्वर्ग आहे ते म्हणजे आई आपल्या मुलीच्या पाया धरुन ढसाढसा अर्धा तास रडली, बेटा तू घरी चल, तरी त्या मुलीला जन्मदात्या आईची दया आली नाही. ती कठोर झाली. आपल्या काही दिवसांच्या प्रेमामुळे त्यामुळे खरंच प्रेम आंधळं असतं याचा प्रत्यय आला.
मुलगी हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. आज रोजी त्या दोघे बºहाणपूर येथे लग्न करून आले. त्यांचे जाबजवाब नोंदवण्यात आले. मुलीने आई वडिलांकडे जाण्यास नकार दिला. ते सज्ञान असल्यामुळे ती त्या मुलासोबत निघून गेली.
- प्रताप इंगळे, पोलीस निरीक्षक, जामनेर