रेल्वेतून पडल्याने परप्रांतीय प्रौढाचा मृत्यू
By Admin | Updated: June 12, 2017 16:26 IST2017-06-12T16:26:16+5:302017-06-12T16:26:16+5:30
धावत्या रेल्वेतून पडल्याने परप्रांतीय राजकुमार गौरीशंकर शर्मा (वय 48) या प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

रेल्वेतून पडल्याने परप्रांतीय प्रौढाचा मृत्यू
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.12 - धावत्या रेल्वेतून पडल्याने परप्रांतीय राजकुमार गौरीशंकर शर्मा (वय 48) या प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. आधार कार्डवरुन त्यांची ओळख पटली आहे. आसोदा रस्त्यावरील रेल्वेगेटजवळच खांबा क्र. 415/22 दरम्यान त्यांचा मृतदेह आढळला. पोलीस कर्मचारी अरूण पाटील, शैलेश चव्हाण, ठाकूर, सोनवणे यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविला. मयत प्रौढाची अंगझडती घेतली असता त्यात त्यांच्या खिशात आधार कार्ड व मोबाईल मिळून आला. पोलिसांनी मिळालेल्या मोबाईलमधून मयत प्रौढाच्या नातेवाईकांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली.