रेल्वेतून पडून पनवेलच्या प्रौढाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 12:24 IST2017-07-23T12:24:01+5:302017-07-23T12:24:01+5:30

शिरसोली मार्गावर डाऊन ट्रक खांब क्र.415/22 ते 415/24 या दरम्यान गुलाममशी यांचा मृतदेह आढळून आला.

Panvel's adult death by going down the train | रेल्वेतून पडून पनवेलच्या प्रौढाचा मृत्यू

रेल्वेतून पडून पनवेलच्या प्रौढाचा मृत्यू

लाईन लोकमतजळगाव, दि. 23 - हबीबगंज-लोकमान्य टिळक या एक्सप्रेसमधून पडल्याने गुलाममशी दिन दयाळ (वय 54, रा.कामोठे, पनवेल जि.रायगड) या प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे साडे चार वाजता उघडकीस आली. शिरसोली मार्गावर डाऊन ट्रक खांब क्र.415/22 ते 415/24 या दरम्यान गुलाममशी यांचा मृतदेह आढळून आला. रामानंद नगर पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. विजय निकुंभ यांनी खिसे तपासले असता त्यात मोबाईल, एटीएम कार्ड, पॅन कार्ड व आधारकार्ड आढळून आले. याशिवाय हबीबगंज या एक्सप्रेसचे आरक्षित तिकीट होते. एस.2 या बोगीचे 52 क्रमांकाचे सीट आरक्षित होते. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.गुलाममशी दिन दयाळ यांचे नातेवाईक रविवार सकाळर्पयत जळगावात पोहचतील.

Web Title: Panvel's adult death by going down the train