सुळे येथे फलक अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:14 IST2021-07-26T04:14:55+5:302021-07-26T04:14:55+5:30
मुक्ताईनगर : तालुक्यातील सुळे गावी ‘सर्व मागासवर्गीय संवैधानिक संघर्ष समिती’ या सामाजिक संघटनेच्या शाखा फलकाचे अनावरण जिल्हा नियोजन ...

सुळे येथे फलक अनावरण
मुक्ताईनगर : तालुक्यातील सुळे गावी ‘सर्व मागासवर्गीय संवैधानिक संघर्ष समिती’ या सामाजिक संघटनेच्या शाखा फलकाचे अनावरण जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ॲड. मनोहर खैरनार यांनी केले. काळानुसार परिस्थितीचा वापर करत मागास जातींनी विकास साधण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक रघुनाथ पोहेकर होते. प्रास्ताविक भास्कर ससाने वडोदा यांनी केले.
याप्रसंगी सुळे येथील शाखेचे अध्यक्ष तेजराव वाघ, उपाध्यक्ष बाळकृष्ण वाघ, नामदेव वाघ, रामभाऊ गोळे, तेजराव जुमडे, सिद्धार्थ गोळे, श्रीकृष्ण वाघ, देवचंद हातणकर, अजय हातणकर, दादाराव वाघ, राजू वाघ, प्रल्हाद गोळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शाहीर कृष्णा झाल्टे यांनी आपल्या बहारदार भीमगीताच्या गायनाने केले.