पांडुरंग पाटील यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:21 IST2021-09-05T04:21:54+5:302021-09-05T04:21:54+5:30
चहार्डी ता. चोपडा : चोसाकाचे माजी संचालक पांडुरंग बाबूराव पाटील (८६, रा. गुजरपुरा) यांचे शनिवारी दुपारी ...

पांडुरंग पाटील यांचे निधन
चहार्डी ता. चोपडा : चोसाकाचे माजी संचालक पांडुरंग बाबूराव पाटील (८६, रा. गुजरपुरा) यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे, मुलगी असा परिवार आहे. सेवानिवृत्त कृषी अधिकारी शरद पाटील यांचे ते वडील होत.
अण्णा पाटील
फरकांडे ता. एरंडोल : विखरण येथील अण्णा फुला पाटील यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात ३ मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
प्रा. दिलीप नारखेडे
जळगाव : पाचोरा येथील एस.एस.एम.एम. महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. दिलीप बळीराम नारखेडे (६६, रा. यशवंत कॉलनी, रिंगरोड) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई व मुलगा असा परिवार आहे. अनिकेत नारखेडे यांचे ते वडील होत.
कल्पना वाणी
जळगाव : कल्पना प्रकाश वाणी (५९, दांडेकरनगर, पिंप्राळा) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्या प्रकाश दामोदर वाणी यांच्या पत्नी होत.
उत्तम चौधरी
नगरदेवळा ता. पाचोरा : मारोती गल्लीतील रहिवासी उत्तम सीताराम चौधरी (८५) यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. रमेश चौधरी यांचे ते वडील होत.