72 लाखांच्या अपहार प्रकरणी अपेक्षा पांडे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2017 16:15 IST2017-05-03T16:13:52+5:302017-05-03T16:15:08+5:30
बोदवड जिल्हा बँकेतील अपहार प्रकरणी आर्थिक गुन्हा शाखेच्या पथकाकडून कारवाई

72 लाखांच्या अपहार प्रकरणी अपेक्षा पांडे अटकेत
बोदवड, दि.3- शहरातील जिल्हा बँकेच्या शाखेतील तब्बल 72 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी बँकेच्या महिला कर्मचारी अपेक्षा विवेक पांडे यांना बुधवारी अखेर अटक झाली.
ठेवीदारांच्या ठेवी, शासनाच्या श्रावण बाळ, संजय गांधी योजनेतील लाभार्थी यांच्या खात्यातील रक्कम सुमारे 72 लाख रुपये बनावट कागदपत्रे, स्वाक्षरीच्या आधारे काढल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील महिला आरोपी अपेक्षा पांडे यांना 3 मे आज रोजी अटक करण्यात आली.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना महिला आरोपी अपेक्षा पांडे या फरार झाल्या होत्या. अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी जिल्हा न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला होता परंतु न्यायालयाने त्यांच्या जामीन नाकारण्यापासून त्या फरारच होत्या. याप्रकरणी 3 मे 2017 रोजी सकाळी 11.45 वाजता जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ए.के.रत्नपारखी, बोदवडचे पोलीस निरीक्षक सी.डी.बनगर, कर्मचारी जीवन पाटील, मसूद शेख, प्रवीण जगताप, महिला पोलीस चव्हाण, सोनवणे यांनी आरोपी महिला अपेक्षा पांडे यांना त्यांच्या राहत्या घरून ताब्यात घेतल. वार्ताहर)